PM Modi Visit To Dehu Mandir | पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी देहूचे मंदिर 3 ऐवजी एकच दिवस राहणार बंद, निर्णयात बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Dehu Mandir | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे येथील देहुतील संत तुकाराम मंदिरात (Sant Tukaram Mandir, Dehu) येणार असल्याने हे मंदिर सामान्य जनतेसाठी सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावरून सर्वत्र टीका सुरू झाल्याने या निर्णयात थोडा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 14 जून रोजी शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे.

 

देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे महाराज यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आणि उद्या मंदिर परिसरात काम सुरु असल्याने काहीकाळ दर्शन बंद राहील.

 

पंतप्रधान पदाच्या प्रोटोकॉलनुसार केंद्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांना कार्यक्रमस्थळाचा ताबा घ्यावा लागतो.
यामुळे भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

 

आधीचा निर्णय बदलला
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणामुळे रविवारी 12 जून सकाळी 8 ते 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देहूतील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता, परंतु आता मंदिर एकच दिवस बंद राहील.

 

आधीच्या निर्णयावर टीका सुरू झाल्याने आता निर्णयात बदल केला आहे. देहू मंदिरात रोज 20 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या आणखी वाढते.

 

Web Title :- PM Modi Visit To Dehu Mandir | changes in decision of dehu mandir for visit of the pm narendra modi dehu mandir will remain closed only for one day

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा