PM मोदींनी नवीन व्यापार अन् कार्यपध्दतीसाठी दिले ‘हे’ 5 मंत्र, सविस्तर जाणून घ्या काय म्हणाले पंतप्रधान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोविड -१९ मुळे या शतकाच्या तिसर्‍या दशकात मोठी उलथा -पालथं सुरू झाली आहे. तसेच कोरोनाव्हायरसमुळे व्यावसायिकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार, आजकाल घर आपल्यासाठी नवीन कार्यालय बनले आहे आणि इंटरनेट आमच्यासाठी नवीन मिटिंग रूम बनले आहे. लिंक्डइनवर एक पोस्ट लिहीत ‘ Life in the era of COVID-19’ या शीर्षकात पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या जग नव्या व्यवसाय मॉडेलच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि नवीन वर्क कल्चरच्या सुरूवातीचे नेतृत्व करू शकतो. या पोस्टमध्ये, त्यांनी व्यावसायिकांना केंद्रित राहण्याबरोबरच निरोगी राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी इंग्रजीतील पाच ‘स्वर’मध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आणि वर्क कल्चर परिभाषित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोविड -१९ संपल्यानंतर हे पाच पैलू कोणत्याही व्यवसायातील मॉडेलचा महत्त्वाचा भाग असतील.

१. Adaptability (अनुकूलनक्षमता)
या वेळी असे व्यवसाय आणि लाइफस्टाइल मॉडेल अवलंबण्याची आवश्यकता आहे, ज्यांना सहज स्वीकारता येऊ शकते. असे केल्याने, संकटाच्या वेळी आपली कार्यालये, व्यवसाय आणि व्यापार सुरळीत चालू राहतील आणि लोकांचे जीवनही सुरक्षित राहील. डिजिटल पेमेंट ही अनुकूलतेचे उत्तम उदाहरण आहे. मोठ्या किंवा लहान दुकानदारांनी अशा डिजिटल साधनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, ज्याच्या मदतीने ते कठीण काळातही आपला व्यवसाय चालू ठेवू शकतात. भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये उत्साहवर्धक वाढ दिसून आली आहे. टेलीमेडिसिन हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे.

२. Efficiency (कार्यक्षमता)
कदाचित ही कार्यक्षमता पुन्हा परिभाषित करण्याची वेळ आली आहे. ऑफिसमध्ये किती वेळ घालवला जातो त्याद्वारे कार्यक्षमतेचा न्याय केला जाऊ नये. आपण अश्या मॉडेल्सचा विचार केला पाहिजे, जिथे उत्पादकता किंवा कार्यक्षमता दर्शविलेल्या प्रयत्नांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

३.Inclusivity (सर्वसमावेशकता)
असे व्यवसायाचे मॉडेल विकसित करण्याची आता वेळ आली आहे, ज्यामध्ये गरीब व वंचितांसोबत पृथ्वीचीही काळजी घेतली पाहिजे. कोविड -१९ ने आम्हाला याची जाणीव करून दिली आहे की, यावेळी कमी खर्चासह मोठ्या प्रमाणात आरोग्य समाधानावर कार्य करण्याची आवश्यकता आहे.

४. Opportunity (संधी)
प्रत्येक संकटासह, काही संधी देखील उद्भवतात. कोविड -१९ हेदेखील असेच एक संकट आहे. आपण कोणत्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी आणि वाढीच्या शक्यतांचा शोध घेऊ शकतो हे मूल्यांकन करण्याची वेळ आता आली आहे.

५. Universalism (सार्वत्रिकता)
कोविड -१९ वंश, धर्म, जाती, भाषा किंवा मर्यादा पाहून पसरत नाही. आपल्या प्रतिसादात आणि आचरणात एकता आणि बंधुभाव असणे आवश्यक आहे. आपण एकत्र आहोत