PM Narendra Modi | CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM मोदींची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

नवी दिल्ली : PM Narendra Modi | कालपासून दिल्ली दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी राज्याच्या विकासासाठी जे लागेल ते सहकार्य केंद्राकडून दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, खूप वेळ मोदींनी मला भेटीसाठी दिला. राज्याच्या विकासाच्या बाबतीत सर्व चर्चा झाली. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल. शेतकरी, कष्टकरी, कामगार सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, त्यासाठी सर्व मदत करू, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)

 

शिंदे यांनी केले पंतप्रधानांचे कौतूक

शिंदे म्हणाले, आज पंतप्रधानांनी आपल्या कर्तुत्वाने या देशाचे नाव उज्वल केलेले आहे. या देशाचा गौरव साता समुद्रापलीकडे पोहोचवला आहे. आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाईल, एवढे मोठे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मलाही आज त्यांना भेटून आनंद झाला, समाधानही वाटले. कारण एका विचाराचे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचे पक्ष एकत्र आले आहेत.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीची माहिती देताना सांगितले की, बाळासाहेबांबद्दल मोदीजींनी भरभरून चर्चा केली. बाळासाहेबांबद्दलचे अनुभव ही त्यांनी सांगितले. बाळासाहेब आणि मोदींचे कसे संबंध होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला इतका वेळ देणे हे मी माझे भाग्य समजतो. राज्याच्या विकासावर त्यांनी खूप मोठी चर्चा केली. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय गृह मंत्री अमित शहा,
तर आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही सदिच्छा भेट घेतली.
त्यांच्या या भेटीत राज्यातल्या खातेवाटपाबाबतही चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

 

Web Title :- PM Narendra Modi | cm eknath shinde and deputy chief minister devendra fadnavis called on pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा