तेल, गॅसच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार 7.5 लाख कोटी रुपये – PM नरेंद्र मोदी

पोलिसनामा ऑनलाईन : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यात अनेक बड्या प्रकल्प आणि योजना सुरू झाल्या आहेत. रामानाथपुरम-थुथुकुडी नैसर्गिक गॅस पाइपलाइन देशाला समर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाच वर्षांत तेल आणि गॅसच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामात साडेसात लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उर्जेची वाढती मागणी भागविण्यासाठी भारत कार्यरत आहे. भारत ऊर्जा आयातीवरील आपले अवलंबित्वही कमी करीत आहे. आम्ही आमच्या आयात स्त्रोतांत वैविध्य आणत आहोत. दरम्यान, बुधवारी पंतप्रधान मोदींनी रामानाथपुरम-थुथुकुडी नैसर्गिक गॅस पाइपलाइन देशाला समर्पित केली.

27 देशांमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक : मोदी
मोदी म्हणाले की, 2012-20 मध्ये आपण परिष्कृत करण्याच्या क्षमतेमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर होतो. सुमारे 65.2 दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची निर्यात झालीय. आज भारतातील गॅस आणि तेल कंपन्या 27 देशांमध्ये कार्यरत असून त्यात 2 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.

मोदी पुढे म्हणाले की, 5 वर्षांत आम्ही तेल आणि गॅसच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामात 7.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केलं आहे. देशातील 470 जिल्ह्यांचा समावेश करून शहराच्या गॅस वितरण नेटवर्कच्या विस्तारीकरणावर भर दिला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यासारख्या आमच्या ग्राहककेंद्रित योजना प्रत्येक भारतीय कुटुंबास मदत करीत आहेत.

पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, रामनाथपुरम ते थुथुकुडीपर्यंत इंडियन ऑईलची 143 किलोमीटर लांबीची नैसर्गिक गॅस पाइपलाइन सुरू करण्यात येत आहे. जी ओएनजीसीच्या गॅस क्षेत्रांमधून आज गॅस कमाई करेल. साडेचार हजार कोटी रुपये खर्चून विकसित होणार्‍या मोठ्या नैसर्गिक गॅस पाइपलाइन प्रकल्पाचा हा भाग आहे. याचा फायदा दक्षिण भारतातील अनेक भागात होणार आहे.