
PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | भाजप (BJP) नेत्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची (BJP Nupur Sharma) हकालपट्टी करण्यात आली. नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परंतु, या दरम्यान आणखी वाद निर्माण झाला आहे. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे आणखी राजकारण तापलं आहे.
मोदी जी से हमारा विरोध देश में है और हम श्री मोदी को भाजपा को लोकतांत्रिक तरीक़े से हरायेंगे।
लेकिन किसी अरब देश के कूड़ेदान पर हमारे देश के प्रधानमंत्री की फ़ोटो ये क़तई अस्वीकार्य है। इसका हर भारतीय को विरोध करना चाहिये
विदेश मंत्री @DrSJaishankar और @MEAIndia संज्ञान ले pic.twitter.com/WmI1HlDge4— Surendra Rajput (@ssrajputINC) June 5, 2022
अरब देशातील कचरा कुंड्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्याने चक्क काँग्रेसकडून (Congress) याबाबत ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत (Congress Leader Surendra Rajput) यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये मोदींचे पोस्टर कचराकुंडीवर चिटकवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनाही टॅग केले आहे.
या ट्विटमध्ये सुरेंद्र राजपूत यांनी म्हटलं आहे की, “मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी.”
Web Title :- PM Narendra Modi | pm narendra modi photos on garbage bags in arab countries
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update