PM मोदींनी शेअर केला अभिनेता कार्तिक आर्यनचा व्हिडीओ, म्हणाले- ‘कोरोना का पंचनामा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यननं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तो एक मोनोलॉग बोलत होता आणि लोकांना कोरोना प्रति जागरूक करत घरातून बाहेर न पडण्यासाठी सांगत होता. त्याचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. आता कार्तिकचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खूप आवडला. त्यांनी ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. पीएम मोदींनी याला एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे.

कार्तिक आर्यनचा व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदी म्हणाले, “या तरूण अभिनेत्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ही वेळ ज्यादा सावधान आहे आणि कोरोनाचा पंचनामा करायचा आहे.”

2011 साली आलेल्या कार्तिक आर्यनच्या प्यार का पंचनामा या सिनेमात कार्तिकनं आपल्या एक मोनोलॉगनं खूप अटेंशन घेतलं होतं. याच अंदाजात बोलत त्यानं लोकांना अलर्ट केलं होतं. चाहत्यांना तर हा मोनोलॉग आवडला होताच परंतु आता पीएम मोदींना देखील हा मोनोलॉग भावला आहे.

आपल्या मोनोलॉग व्हिडीओच्या माध्यमातून कार्तिक आर्यन लोकांना घरातून बाहेर न पडण्यासाठी सांगत होता. कोरोनाची दहशत जगभर वाढत आहे. भारतातही याचा प्रसार वाढत चालला आहे.