राम मंदिर मुद्द्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा 

अलवार : राजस्थान वृत्तसंस्था – राम मंदिराच्या मुद्द्यावर सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलेल्या शिवसेनेच्या राजकीय कृतीची अप्रत्यक्ष दखल मोदींनीही घेतली आहे. राजस्थानच्या येथे एका सभेत बोलताना मोदींनी राम मंदिराला होत असलेल्या उशीराला काँग्रेसचं कारणीभूत असल्याचे म्हणले आहे. काँग्रेसला वाटते कि २०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम मंदिराचा प्रश्न निकाली निघू नये म्हणून काँग्रेस मोठे मोठे वकील न्यायालयात उभे करून राम मंदिराचा खटला निकाली निघू देत नाही असे मोदी म्हणाले.

राजस्थानच्या अलवार येथे प्रचार सभेला अले असता मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. राजस्थान विधान सभेच्या निवडणुकीत राम मंदिर मुद्द्याला हात घालण्यासाठी आणि राजपूत मतांची बेगमी करण्यासाठी मोदींनी सॉफ्ट हिंदुत्वाची किनार पकडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. राम मंदिराच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला इक्बाल अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. त्यांचा खटला काँग्रेस सरकारात केंद्रीय कायदा मंत्री राहिलेल्या  कपिल सिब्बल यांनी लढवला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हा खटला लोकसभेच्या निवडणुकी नंतर लढवला जावा असे  सांगितले. कारण लोकसभेच्या निवडणुकी वेळी या मुद्द्याचे भांडवल केले जाण्याचा आणि सामाजिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे सिब्बल म्हणाले होते. त्यांच युक्तिवादाचा धागा पकडून मोदींनी आज राजस्थान येथील जाहीर सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना प्रभू रामाचे आशीर्वाद प्राप्त होऊ देत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदींच्या घणाघाती आरोपाचा काँग्रेस पक्ष शिकार होत असतानाच आता काँग्रेसने हि भाजपच्या विरोधात चांगलीच कंबर कसली आहे. मोदींच्या या टीकेला काँग्रेसच्या वतीने कोणते उत्तर दिले जाईल हे बघण्यासारखे राहणार आहे. परंतु काँग्रेस मोदींच्या वक्तव्यावर पलट वार करू शकणार नाही कारण त्यांनी सिब्बल यांना हा खटला घेण्यापासून रोखायला हवे होते. काँग्रेसने त्यांना हा खटला घेण्यापासून नरोखल्याने मोदींच्या बोलण्यात तथ्य आहे असा लोकांचा समज होऊ शकतो.

दरम्यान  उध्दव ठाकरे अयोध्ये  वरून परत आले असून आज अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची धर्म संसद भरली आहे या कार्यक्रमाला देश भरातून लाखो कार्यकर्ते अयोध्येत उपस्थित राहिले आहेत.