PMC Biomining Project | मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी बायोमायनिंग प्रकल्प 6 महिन्यांपासून ठप्प ! देवाची उरुळी, फुरसुंगी येथील नागरिकांचा जाच काही संपेना; ‘पॉवरफुल’ नेत्याच्या आशीर्वादाने घनकचरा विभाग सुसाट

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Biomining Project | मर्जीतील ठेकेदाराला (Contractor) काम मिळावे यासाठी घनकचरा विभागाच प्रयत्नशील असल्याने देवाची उरुळी येथील ‘ बायोमायनिंग ‘ प्रकल्प (Devachi Uruli Biomining Project) तब्बल सहा महिने बंद ठेवण्यात आला आहे. ‘एनजिटी’च्या (NGT) आदेशानंतर देखिल जुन्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष असे की, एका ‘पॉवरफुल’ नेत्याच्या आशीर्वादाने घनकचरा विभागाचा (Solid Waste Management PMC) हा कारभार सुरू असून याचा फटका देवाची उरुळी आणि फुरसुंगी (Phursungi) येथील नागरिकांना सोसावा लागत आहे.(PMC Biomining Project)

देवाची उरुळी येथील कचरा डेपो मध्ये ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे.
येथे वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया (बायो मायनिंग) करून कचऱ्याचे ढीग हटविण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे 12 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बरीचशी जागा रिकामी करण्यात आली आहे.
तरीही अद्याप 34 लाख मेट्रिक टन कचरा तसाच आहे. परंतु यानंतरही घनकचरा विभागाने केवळ अडीच लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याच्या निविदेची (Tender For Biomining Project) तयारी केली. यानंतर माजी आयुक्तांनी कचरा डेपोची पाहणी केली आणि दहा लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची निविदा काढण्याचे आदेश दिले. अशातच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आचारसंहिता लागल्याने सर्वच प्रक्रिया थांबली आहे.

ADV

याची माहिती अशी की, हे काम एका मर्जीतील ठेकेदाराला मिळावे यासाठी घनकचरा विभागातील एका ‘पॉवरफुल’ नेत्याचा आशीर्वाद असलेल्या अधिकाऱ्याची ईच्छा आहे.
त्याने पूर्वी या विभागात काम केलेल्या परंतु सध्या अन्य विभागात काम करत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे.
ज्या ठेकेदाराला मिळवुन द्यायचे आहे, त्याला एका प्रकल्पात वाढीव कॅपेसिटीचे काम मिळवून देण्यात याच अधिकाऱ्यांनी मदत केली होती.
यासाठी अधिकची मशिनरी बसवण्यासाठी पैसेही महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) अदा केले आहेत.
परंतु प्रत्यक्षात मशिनरी बसविली गेलीच नाही.
तसेच देवाची उरुळी येथील कचरा डेपोचे कॅपिंग प्रकल्पातील सायंटिफिक लँड फिलिंगचे कामही देण्यात आले होते.

या प्रकल्पात कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या लिचेट वर प्रक्रिया करण्यासाठी देखील पैसे मोजण्यात आले. मात्र, या लीचेटवर प्रक्रिया च केली गेली नाही. हे लिचेट येथील विहिरींमध्ये साठवून तेच पुन्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर मारण्यात आले, असेही आता अधिकारीच सांगत आहेत, असे असतानाही केवळ ‘ पावर फुल्ल ‘ दादा नेत्याच्या ऐकण्यातला अधिकारी बायोमायनिंग, सायंटिफिक लॅन्डफिल्लिंग आणि रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाचे (Garbage Project at Ramtekdi) काम त्या मर्जीतील ठेकेदाराला देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

आयुक्त कारवाई करणार?

  • देवाची उरुळी येथील सायंटिफिक लॅन्डफिल्लिंग मध्ये लिचेट वर प्रक्रिया न करताच ठेकेदाराला लाखो रुपये बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
  • रामटेकडी येथील प्रक्रिया प्रकल्पात वाढीव कॅपेसिटी साठी अधिकची मशिनरी न बसवतात महापालिकेकडून कोट्यवधी रूपये घेणारे ठेकेदार- अधिकाऱ्यांची चौकशी होणार ?

महापालिकेने आंबेगाव येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाला नागिरकांनी तीव्र विरोध केला.
याठिकाणी एका स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी तेथील कचरा पेटवून दिला.
यामध्ये प्रकल्पातील मशिनरी देखील खाक झाली. विशेष असे की तो प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन नुकतेच एका ‘ पावरफुल’ नेत्याने दिले आहे.
विशेष असे की आंदोलनकर्ता नगरसेवक ही त्याच पक्षाचा असून त्याची मात्र आता गोची झाली आहे.
या प्रकल्पावरून संबंधित नेता, अधिकारी आणि ठेकेदार यांचे संबध अधिकच अधोरेखित होत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी