PMC Draft Ward Structure | पुणे मनपाच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींवर 24 आणि 25 फेब्रुवारीला सुनावणी; बालगंधर्व रंगमंदिरात होणारी सुनावणी ‘वेळापत्रका’ नुसारच

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर (PMC Draft Ward Structure) मागविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये (Balgandharva Rang Mandir) सकाळी १० ते ६ या वेळेत होणार्‍या या सुनावणीसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसारच संबधितांनी सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी केले आहे. (PMC Draft Ward Structure)

 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत (Pune Corporation) नगरसेवकांची संख्या १७३ राहाणार असून ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय तर एक प्रभाग द्विसदस्यीय असेल. राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर (PMC Draft Ward Structure) १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती मागविण्यात आल्या आहेत. शहरातून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक हरकती आल्या असून वानवडी – रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयातून (Wanowrie Ramtekdi Ward Office) सर्वाधीक तर शिवाजीनगर- घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयातून (Shivajinagar – Ghole Road Ward Office) सर्वात कमी हरकती आल्या आहेत. यशदाचे संचालक एम.चोकलिंगम (M. Chockalingam) यांची प्राधीकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला त्यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी होणार आहे.

प्रभागनिहाय हरकती व सूचनांवर सुनावणीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

 

२४ फेब्रुवारी

प्र.क्र. १ ते ९ – सकाळी १० ते ११.३०.
१० ते १६ – सकाळी ११.३० ते दुपारी १.
१७ ते २० आणि ३०,३१,३३,३५ – दुपारी २ ते ४.
२७ ते २९ – दुपारी ४ ते ६.

 

२५ फेब्रुवारी


प्र.क्र.
२१,२२,२३,२५,२६, ४१ ते ४६ – सकाळी १० ते ११.३०
३७ ते ४० – सकाळी ११.३० ते १.
४७ ते ५० आणि ५७ – दुपारी २.३० ते ३.३०.
५१,५३ ते ५६ – दुपारी ४.३० ते ६.

 

Web Title :- PMC Draft Ward Structure | Hearing on objections on draft ward structure of Pune Municipal Corporation on 24th and 25th February; Hearing at Balgandharva Rangmandir as per schedule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

 

Maharashtra Police | ‘वसुली’ प्रकरणात 2 ‘बड्या’ पोलिस अधिकार्‍यांना अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरार; राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

 

Multibagger Penny Stock | 10 पैशांवरून 590.45 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, दिला 5 लाख टक्के जबरदस्त रिटर्न, 1 लाख रुपयांचे झाले 59 कोटी