PMC Employee – 7th Pay Commission | खुशखबर ! पुणे मनपा कर्मचार्‍यांसाठी आनंदाचा दिवस; 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Employee – 7th Pay Commission | महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार (PMC Employee – 7th Pay Commission) फरकाची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास मान्यता देण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या वेतनासोबतच फरकाचा हप्ता देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade – PMC) यांनी दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना काही महिन्यांपुर्वी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागणार आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी जानेवारी 2016 पासूनच्या वेतनातील फरकाची रक्कम 5 ते 7 टप्प्यात देण्याची घोषणा केली होती. परंतू या घटनेलाही सात महिने उलटून गेल्यानंतर अद्याप फरकाची रक्कम देण्यात आली नव्हती. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये प्रामुख्याने कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
कामगार युनियनने देखिल यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
अखेर आज अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जुलै महिन्याच्या वेतनासोबतच फरकाच्या रकमेचा पहिला टप्प्याची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.

 

Web Title :- PMC Employee – 7th Pay Commission | Happy Day for Municipal Employees; The amount of the first phase of the 7th Pay Commission difference will be given along with the salary of the month of July

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | PF खात्यात वार्षिक योगदानावर मिळालेल्या व्याजावर कधी आणि किती लागणार टॅक्स? एक्सपर्टकडून जाणून घ्या सर्व नियम

 

Pune Crime | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपींची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता

 

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग