PMC Employees Pune | महापालिकेने 25 हजार कर्मचार्‍यांचे वेतन आणि 20 हजार सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या पेन्शनसाठी तयार केलेले ‘पगार -पेन्शन’ सॉफ्टवेअर मे महिन्यापासून वापरात आणणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे

एप्रिलच्या वेतनापासून सॉफ्टवेअरचा वापर सुरू; निवृत्तांना तातडीने पेन्शन सुरु होण्याचा मार्ग मोकळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Employees Pune | महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आणि महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील तब्बल २५ हजार अधिकारी, शिक्षक आणि कर्मचार्‍यांना यापुढील काळात विनाविलंब वेतन (PMC Employees Salary) मिळणार आहे. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने पेन्शनही (Retired PMC Employees Pension) मिळणार आहे. यासाठी महापालिकेने ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सर्व कर्मचार्‍यांचा डेटा घेण्यात आला असून तो लॉगइन आयडीद्वारे प्रत्येक कर्मचार्‍याला पाहाता येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी दिली.

महापालिकेकडे सुमारे १६ हजार अधिकारी व कर्मचारी कायम स्वरूपी असून चार हजार कर्मचारी एकवट वेतनावर आहेत. तर शिक्षण मंडळाकडे पाच हजार शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या २० हजार कर्मचार्‍यांना पेन्शन सुरू आहे. दरमहा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे वेतन व अन्य देणी देण्यासाठी विभागवार बिल क्लार्कची नेमणूक करण्यात आली आहे. हे बिल क्लार्क कर्मचार्‍यांच्या सुट्टया, रजा व अन्य बाबींची आकडेमोड करून वेतनचिठ्ठी तयार करतात. या वेतनचिठ्ठीनुसार संबधितांचे मासिक वेतन थेट बँकखात्यावर जमा केले जाते. कार्यरत आणि निवृत्त कर्मचार्‍यांची संख्या मोठी असल्याने बरचेदा पगार बिले सादर करण्यास विलंब लागत असल्याने काही विभागांतील कर्मचार्‍यांच्या वेतनास विलंब लागतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मागीलवर्षी पगार आणि पेन्शनसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला.

या सॉफ्टवेअरवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संपुर्ण माहिती, वेतनश्रेणी आणि त्यानुसार देण्यात येणारे भत्ते, सर्व्हिस बुकमधील माहिती अपलोड करण्यात आली आहे. तर पेन्शनरांची माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाने हे सॉफ्टवेअर आणि जुन्या पद्धतीने पगार करण्यास प्रायोगीक तत्वावर सुरूवात केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या नव्या सॉफ्टवेअरचे सर्व पगार बिल क्लार्कला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे वेतन मे मध्ये या सॉफ्टवेअरद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

बिनवडे यांनी सांगितले, की प्रत्येक कर्मचार्‍याला मोबाईलवरूनही त्याच्या पगारबिलाची तसेच सर्व्हिस बुकची माहिती घेण्याची सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये आहे. यासाठी कर्मचार्‍याला आधार क्रमांक आणि कर्मचारी आयडी क्रमांकाच्या माध्यमांतून लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांना यापुढील काळात रजेचे अर्जही ऑनलाईनच सादर करावे लागणार आहेत. सर्व्हिस बुकमधील सद्यस्थिती देखिल या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचार्‍याला समजू शकणार आहे.

सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला सहा महिने अगोदरच कोणती कागदपत्र सादर करायची, कोणत्या विभागाच्या एनओसी घ्यायच्या आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यांना स्वत: पेन्शनची प्रकरणे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे पेन्शन प्रकरणांचा विलंब कमी होणार असून निवृत्तीनंतरच्या पुढील महिन्यांपासून पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे नंतरही दोन महिने पुर्वीची पगाराची पद्धत समांतरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज