PMC Encroachment Action | सत्ताधाऱ्यांना जे जमलं नाही ते प्रशासक म्हणून नियुक्त झाल्यानंतर विक्रम कुमार यांनी करून दाखवलं, DP रोडवरील तब्बल 68 मिळकतींवर अतिक्रमण कारवाई

पुण्यातील म्हात्रे पूल ते महालक्ष्मी लॉन्स (डी.पी. रस्ता) या दरम्यान हरित पट्टा व ब्लू लाईन मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Encroachment Action | पुणे महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) सत्ताधाऱ्यांना जे जमलं नाही ते प्रशासक म्हणून नियुक्त झाल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी करुन दाखवले आहे. पुण्यातील म्हात्रे पूल ते महालक्ष्मी लॉन्स (डी.पी. रस्ता) या दरम्यान हरित पट्टा व ब्लू लाईन मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई (PMC Encroachment Action) करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करुन नदीपात्रालगत असलेल्या हॉटेल, घरे, मंगलकार्यालयावर कारवाई करण्यात आली.

पुणे महापालिकेच्या बंधकाम विकास विभाग झोन 6 कडून आज (बुधवार) म्हात्रे पूल (Mhatre Pool) ते महालक्ष्मी लॉन्स (Mahalakshmi Lawns) दरम्यानच्या नदी पात्र ते 360 मी. डीपी रस्ता (DP Road) दरम्यानच्या हद्दीतील हरित पट्टा व ब्ल्यू लाईन (Blue Line) मधील बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये लॉन्स, गॅरेज, हॉटेल व इतर व्यावसायिक वापराच्या मिळकतींवर कारवाई (PMC Encroachment Action) करण्यात आली.

या कारवाईमध्ये 76 मिळकतींना नोटीस देण्यात आली होती. त्यांपैकी 8 मिळकतींना कोर्टाचा स्टे (Court Stay) असल्याने या मिळकती सोडून उर्वरित 68 मिळकतींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 4 लाख 3 हजार चौरस फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. मागील काही वर्षातील अनधिकृत बांधकामांवरील ही मोठी कारवाई आहे. एवढी वर्षे राजकीय दबावामुळे अतिक्रमण कारवाई करता येत नव्हती. मात्र, प्रशासक म्हणून नियुक्त होताच आयुक्त विक्रम कुमार यांनी करुन दाखवलं आहे.

या कारवाईमध्ये 20 जेसीबी, 12 गॅस कटर, 8 ब्रेकर तसेच 200 बिगारीयांचा वापर करण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 25 पोलीस व 100 सुरक्षा रक्षक, 15 अतिक्रमण निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला होता.
नदीपात्रालगत हरित पट्टा व ब्ल्यू लाईन मध्ये क्षेत्रामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम
तसेच भराव टाकण्याचे काम करु नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) यांनी केले आहे.

 

Web Title :- PMC Encroachment Action | Vikram Kumar did what the ruling party did not
get after being appointed as administrator, encroachment action on 68 properties on DP Road Mhatre Pool to Mahalakshmi Lawns Blue Line


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMC Property Tax | मिळकतकरातील 40 टक्के सवलत रद्द ! 2018 पासून दिलेल्या सवलतीच्या आकारणीमुळे ‘अव्वाच्या सव्वा’ बिलांमुळे पुणेकर मेटाकुटीस; सर्वच राजकिय पक्ष मूग गिळून बसल्याने पुणेकर हवालदील

Pune Metro | स्वारगेट ते कात्रज या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल प्रकल्पास ठाकरे सरकारची मान्यता !

Nashik Crime | सासरच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या