PMC GB Meeting | पुणे मनपात निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी; तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC GB Meeting | वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून स्थायी समिती आणि आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या ‘कोल्ड वॉर’ वरून विरोधकांनी आयुक्तांना फिल्मी गाण्याचे  मुखडे ऐकून विनंती केली (PMC GB Meeting) तर सत्ताधाऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा देत निधी नसल्याने रखडलेल्या कामांची यादीच सर्वसाधारण सभेत वाचून दाखवत हतबलता व्यक्त केली.

अंदाजपत्रकाची (PMC Budget) 100 टक्के अंमलबजावणी करन्यावरून स्थायी समिती आणि  आयुक्तांमध्ये वाद सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली पाहिजेत यासाठी स्थायी समिती आग्रही आहे. तर उत्पन्न, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करण्याची भुमिका आयुक्तांनी (PMC GB Meeting) घेतली आहे. यामुळे तीन आठवड्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी आयुक्तांचा निषेध करत सभा तहकूब केली. त्यामुळे आयुक्तांनीही पुढील दोन्ही स्थायी समितीकडे पाठ फिरवली.

PMC General Meeting | पुणे मनपा सर्वसाधारण सभा : निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

दरम्यान आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल (Shivsena Corporator Bala Oswal) यांनी आयुक्तांना’ हा रुसवा सोडा आयुक्त बजेट उपलब्ध करून घ्या ना ‘ हे पद्य स्वरूपात गाऊन आयुक्तांना बजेट वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली. तर काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी ‘ छोडो कल की बाते, कल की बात पुराणी ‘ असा मुखडा गात आयुक्तांना चुचकारन्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे (BJP Corporator Rajshree Kale) यांनी प्रभागातील मूलभूत कामे रखडलीत आयुक्तांनी बजेट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. हरिदास चरवड (Corporator Haridas Charwad) यांनी कामे होत नसल्याने रस्त्यावर फिरता येत नाही. आदित्य माळवे यांनी यावेळी त्यांच्या प्रभागातील रखडलेल्या छोट्या कामांची यादी वाचून दाखवली. आरती कोंढरे  (Corporator Arti Kondhre) यांनी पालिकेचे उत्पन्न चांगले असताना अशा पद्धतीने कामे अडवणे हा जनमताचा अपमान आहे, लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी केली. मंजुषा नागपुरे (bjp corporator manjusha nagpure), विशाल धनवडे (Shivsena corporator Vishal Dhanawade), राजाभाऊ लायगुडे (corporator raja bhau laigude), सिद्धार्थ धेंडे, गणेश ढोरे, सुभाष जगताप, वसंत मोरे आदींची यावेळी भाषणे झाली.

काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे (PMC Congress Corporator Avinash Bagwe) यांनी आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन करताना रंग रंगोटी,
पिशव्या खरेदी, नामफलक,  बेंचेस एकाच कामाची टेंडर तीन तीन वेळा टेंडर काढले जातात.
जेथे कामाची गरज आहे तेथे खर्च केला जावा परंतु अनावश्यक पैशाचा अपव्यय टाळावा अशी सूचना केली.

लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात घालून काम करत आले आहे.
कुठलीही गोष्ट दोन्ही बाजूने ताणली जाऊ नये. यातून सुवर्णमध्य काढावा.
गुरुवारी पक्षनेते, आयुक्त व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा,
असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यावेळी केले.

Web Titel :- PMC GB Meeting | pune corporation general body meeting PMC GB news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Actress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत हल्लेखोर पसार

Nashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर रद्द; ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जिल्ह्यात ‘तुफान’ चर्चा