Caornavirus : पुण्यातील तीन खासगी लॅब्सला पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह पुणे शहरात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी खासगी लॅबला परवानगी देण्यात आली आहे. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोना चाचण्याचे अद्यावत अहवाल महाराष्ट्र शासन व इतर विविध शासकीय यंत्रणांना पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी वेळेत पाठवणे आवश्यक आहे. मात्र, खासगी लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नसल्याने पुणे महापालिकेने पुण्यातील तीन खासगी लॅब्सला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पुण्यातील लॉबोरेटरी सर्व्हिसेस आयुजेन बायोसायन्सेस प्रा.ली, क्रस्ना डायग्रोस्टिक्स प्रा. लि. आणि ए.जी. डायग्नोस्टिक्स प्रा. लि. या तीन खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात येते. मात्र या तीनही लॅबकडून दैनंदिन कोरोना चाचणी अहवाल उशिराने प्राप्त होत आहे. त्यामुळे माहिती वेळेत सादर होत नसल्याने आणि कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला अडचणी येत आहे. या तिनही लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नसल्याने पालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुणे महापालिकेने लॉबोरेटरी सर्व्हिसेस आयुजेन बायोसायन्सेस प्रा.ली, क्रस्ना डायग्रोस्टिक्स प्रा. लि. आणि ए.जी. डायग्नोस्टिक्स प्रा. लि. या तीन खासगी लॅबला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) डॉ. कुणाल खेमनार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अंतर्गत प्रयोगशाळा बंद करणे व लॅबची नोंदणी रद्द करण्याच्या कारावाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.