PMC Health Department Pune | महापालिकेचे दवाखाने, शहरी गरीब आणि अंशदायी योजनेतील औषधांची मागणी आता ‘ऑनलाईन’च करावी लागणार; आरोग्य विभागाने विकसित केले सॉफ्टवेअर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Health Department Pune | महापालिकेचे सर्वच विभागांच्या जवळपास सर्वच सेवांचे संगणकीकरण पूर्ण होत आले आहे. आरोग्य विभागानेही मागीलवर्षी शहरी गरीब आरोग्य योजनेचे कार्ड ऑनलाईन (Shahari Garib Yojana) उपलब्ध करून दिले असून लवकरच या योजनेअंतर्गत तसेच कर्मचार्‍यांच्या अंशदायी योजनेअंतर्गत (Anshdayi Pension Yojana) देण्यात येणार्‍या औषधांची मागणी देखिल ऑनलाईनच नोंदविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. लवकरच महापालिकेच्या सर्व दवाखान्यांतून गाडीखाना येथील सेंट्रल मेडीकलकडे औषधांची फक्त ऑनलाईन मागणीच स्वीकारली जाणार आहे. (PMC Health Department Pune)

महापालिकेच्यावतीने दरवर्षी मोठ्याप्रमाणामध्ये औषध खरेदी करण्यात येते. महापालिकेचे सर्व दवाखाने, ओपीडी तसेच प्रसुतीगृहांच्या मार्फत या औषधांचा वापर आणि पुरवठा रुग्णांना करण्यात येतो. आतापर्यंत या दवाखान्यांकडून पारंपारिक पद्धतीने गाडीखाना येथील सेंट्रल मेडीकलकडे औषधांची मागणी करण्यात येते. दवाखान्यांकडून आलेल्या औषध मागणीच्या चिठ्ठयांनुसार सेंट्रल मेडीकलकडून औषधांचा पुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या दवाखान्यांची संख्या तसेच शहरी गरीब कार्ड, अंशदायी योजनेच्या माध्यमातून येणार्‍या औषधांच्या चिठ्ठयांचे प्रमाण खूपच असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे ऑडीट करणे जिकरीचे काम आहे. या पार्श्‍वभूमीवर औषध पुरवठ्यामध्ये अधिकची पारदर्शकता, वेळेची आणि मानवी श्रमांची बचत तसेच औषधांचे ऑडीटही सुलभ होण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्यावतीने सॉफ्टवेअर आणि मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे.

या सॉफ्टवेअरमुळे महापालिकेच्या दवाखान्यांमधून सॉफ्टवेअर आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातूनच औषधं मागणीची सुविधा निर्माण होणार आहे. शहरी गरीब कार्ड तसेच अंशदायी योजनेतून मिळणार्‍या औषधांची मागणी देखिल रुग्णांना संबधित दवाखान्याच्या माध्यमातूनच नोंदवावी लागणार आहे. यामुळे औषध साठ्याचे नियोजन, पुरवठा आणि ऑडीट करणे सहज सोपे होणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज