PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti | ‘सिंहगडावर’ पर्यटनाच्या दृष्टीने महापालिका सुरू करणार ‘सिग्नेचर वॉक’

प्राथमिक सुविधांसह बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न – विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti | शहरातील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देशा-परदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी लवकरच सिंहगड किल्ला, आंबेगावमधील शिवसृष्टी येथे सिग्नेचर वॉक सुरू करणार आहे. शहरातील विविध भागातील पर्यटकांना स्वारगेट येथून वातानूकुलित मिनी बसदारे ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुरातत्व विभाग आणि वनविभागाशी चर्चा करून गडावर पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी दिली. (PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti)

पुण्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात सुमारे अडीचशे ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तू पाहण्यासाठी देशा-परदेशातून पर्यटक येतात. त्यांना या वास्तू, त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्य जाणून घ्यायची असतात. अशा पर्यटकांसाठी देशातील काही शहरांप्रमाणे व परदेशातील सुविधांप्रमाणे सिग्नेचर हेरिटेज वॉक सुरू केला जाणार आहे. (PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti)

सध्या महापालिकेने संयुक्त सहभागातून हेरिटेज वॉक उपक्रम सुरू केला आहे. शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वस्तू दरम्यानची बारा ऐतिहासिक ठिकाणी पायी फिरून या उपक्रमातून दाखवली जात आहे. त्यात आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून दुसरा हेरटेज वॉक सिंहगड किल्ला आणि आंबेगाव येथील शिवसृष्टी हा सुरू करण्यात येणार आहे. हा सिग्नेचर वॉकची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. या डेमो वॉकमध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते, शाखा अभियंता दीपक बारभाई आणि गाईड डॉ. अजित आपटे सहभागी झाले होते.

शहरात देश विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी आणि शहरातील नागरिकांसाठी सिग्नेचर वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी स्वारगेट येथून या वॉकसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांना हॉटेलमधून या सिग्नेचर वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार्‍या या वॉकमध्ये सिंहगड किल्ला व त्यावरील ऐतिहासिक ठिकाणी दाखवण्यात येणार आहे.

पालिकेने नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ सुशोभीकरणाचे काम केले आहे.
या ठिकाणी पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी समाधी स्थळाच्या दर्शनी भागामध्ये दुसर्‍या टप्प्यामध्ये
लवकरच काम करण्यात येणार आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन आणि
संवर्धन करण्याचे कामही करण्यात येणार आहे. सिंहगड किल्ल्यावर दिशादर्शक बोर्ड बसविण्यात येणार आहेत.
सिंहगड किल्ल्यानंतर या सिग्नेचर वॉकमध्ये आंबेगाव येथील शिवसृष्टी दाखविण्यात येणार आहे.
उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हेरिटेज वॉक डॉट पीएमसी डॉट गव्ह डॉट इन ही लिंक असून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा