Sinus Symptoms | हिवाळ्यात वाढते बंद नाक-सर्दीची समस्या, असा मिळवा आराम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sinus Symptoms | सध्याची महामारी आणि वाढता हिवाळा या दरम्यान थंडीमुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीपासून स्वतःचा बचाव करणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात नाक आणि घशाच्या समस्या सामान्य असतात. डॉ रणबीर सिंग, सल्लागार ईएनटी सर्जन, केअर हॉस्पिटल, हैद्राबाद, हे म्हणतात की अ‍ॅलर्जीमुळे नाक वाहणे, घसा खवखवणे, पाणी येणे, खोकला, ताप इत्यादी समस्या उद्भवू शकतात. (Sinus Symptoms)

 

नाक बंद का होते?
अ‍ॅलर्जीमुळे नाकपुड्यांमध्ये सूज येते, ज्यामुळे नाकातून श्वास घेणे कठीण होते. वास्तविक याला इंग्रजीत ‘Nasal Congestion‘ असे म्हणतात, ज्यामध्ये नाक बंद होणे ही समस्या असते. डॉक्टर सांगतात की सामान्य सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील नाक बंद होण्याची शक्यता असते.

 

बंद नाकाची समस्या कशी दूर करावी?
डॉ सिंग यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीहिस्टामाईन्स, ठराविक नसल स्टिरॉईड स्प्रे किंवा नसल सलाईन स्प्रे देखील घेऊ शकता. आपले नाक नियमितपणे धुणे हा बंद नाकापासून मुक्त होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

 

यामुळे नाकाची इम्युनिटी वाढतेच, शिवाय नाकाची कार्यक्षमताही चांगली राहते. शिवाय, अ‍ॅलर्जीक राहिनाईटिस असलेल्या लोकांना औषधांसह नियमितपणे नाक धुण्यास सल्ला दिला जातो. (Sinus Symptoms)

नाक स्वच्छ ठेवण्याची सवय
आजारांपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात नाक नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
नाकात कफ, धूळ, बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशी जमा होते, त्यामुळे जंतू आणि रोगांसाठी अनुकूल वातावरण बनते.

 

तुमचे नाक योग्यरित्या कार्य करत राहण्यासाठी सायनस स्वच्छ आणि मॉइश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करा.
सायनसची समस्या दूर करण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी या सवयी खूप प्रभावी आहेत.

 

 

Web Title :- Sinus Symptoms | problem of nasal congestion a symptom of sinus increases in winter follow this remedy to prevent sinus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | पुण्यातील ‘या’ कंपनीचा 14 रुपयांचा स्टॉक देतोय बंपर रिटर्न! गुंतवणुकदारांचे 1 लाख केले रू. 18 लाख, तुमच्याकडे आहे का?

 

Fatty Liver Home Remedies | फॅटी लिव्हरने असाल त्रस्त तर दररोज करा ‘ही’ 4 योगासन, आहारात करा ‘हे’ 5 बदल; जाणून घ्या

 

Mira Road Crime | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच केली 2 वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून