PMGKAY | देशातील 80 कोटी गरीबांना नोव्हेंबरनंतर सुद्धा मिळणार का मोफत रेशन? केंद्रीय सचिवांनी दिली ‘ही’ माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PMGKAY | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे पीएमजीकेएवाय PMGKAY (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) अतंर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन कदाचित मिळणार नाही. कारण, केंद्र सरकारचे अन्न आणि ग्राहक प्रकरणांचे सचिव सचिव सुधांशु पांडे यांनी शुक्रवारी म्हटले की, या योजनेंतर्गत मोफत रेशन वितरण नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. देशाची अर्थव्यवस्था रूळावर येत आहे, यासाठी मोफत रेशन देण्याची योजना पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

 

मागील वर्षीपासूनच केंद्र सरकारकडून PMGKAY योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत रेशन पुरवले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा मागील वर्षी मार्चमध्ये करण्यात आली होती. सुरूवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 च्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवली होती.

 

सबसिडीच्या धान्यासह दिले जाते मोफत रेशन

 

PMGKAY अंतर्गत देशातील तब्बल 80 कोटीपेक्षा लोकांना प्रति महिना 5 किलो मोफत गहू/तांदूळसह 1 किलो मोफत हरभरा प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध केले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 80 कोटी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिले गेले असल्याचे आढळून आले आहे. रेशन दुकानांच्या माध्यमातून या गरीबांना वितरित करण्यात येणार्‍या सबसिडी धान्यासह मोफत रेशन दिले जाते.

 

Web Title : PMGKAY | centre government has no proposal to extend free ration scheme beyond 30 november says food secretary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मोठा धक्का ! आर्यन खान, नवाब मलिकांच्या जावयाच्या केससह 6 प्रकरणांचा तपास मुंबई झोनकडून काढला; पण…

Accident News | दुर्देवी ! भाऊबीजेला मामाकडे जाताना भीषण अपघात; सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू, इतर दोघे गंभीर

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 36 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी