PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या

सीएनजीच्या थकबाकी पोटी 10 कोटी देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML | पुणे महापालिका (Pune Corporation) कर्मचाऱ्यांना (pmc employees) दिवाळी निमित्त बोनस (diwali bonus)
जाहीर झाला असला तरी पीएमपीच्या (PMPML) दहा हजार कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत साधी चर्चा ही नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना दिवाळीच बोनस देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने (standing committee) मंजुरी दिली आहे. त्यासाठी 24 कोटी रुपये अॅडव्हान्स पोटी देण्यात येणार आहेत.

 

पुणे महापालिका (Pune Corporation) व शिक्षण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीचा बोनस व सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. एवढेच न्हवे तर कोरोनामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याने यंदाच्या वर्षी अतिरिक्त तीन हजार रुपये बक्षीस ही जाहीर करण्यात आले आहे. परंतु पीएमपीएमएल (PMPML) कर्मचार्यांबद्दल काहीच निर्णय झालेला नव्हता. पीएमपीएमएल सर्व सेवकांना दिवाळी बोसन देण्याचा प्रस्ताव नगरसेवक महेश वाबळे (Mahesh Wable) यांनी मांडला. या प्रस्तावाला सूचक म्हणून वर्षा तापकीर (Varsha Tapkir) तर अनुमोदन मानसी देशपांडे (Mansi Deshpande) यांनी दिले.

 

बोनस प्रस्तावाला मंजूरी

पीएमपीएमल कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला नसल्याने तिघांनी प्रस्ताव मांडला. प्रस्ताव मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने ही रक्कम वर्ग करावी असे आदेश देण्यात आले असल्याचे हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी सांगितले. तसेच दिवाळी तोंडावर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सीएनजीच्या थकबाकी पोटी 10 कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.

 

बोनससाठी 25 कोटी रुपये मंजूर
पीएमपीएमएलच्या (PMPML) कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 25 कोटी रुपयांची गरज आहे.
तसे मागणीपत्रही पीएमपीएमएल ने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले आहे.
मात्र, प्रशासनाकडून त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली आहे.
परंतु प्रशासनाने पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला नाही.
तसेच स्थायी समितीने (pmc standing committee) ही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही.
अखेर आजच्या बैठकी मध्ये या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्याला तात्काळ मंजूरी देण्यात आली.
त्यामुळे पीएमपीएमल कर्मचाऱ्याची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

 

Web Title :- PMPML | Diwali for 10,000 employees of PMPML to be approved by pmc standing committee, Find out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Crime Branch Police | कपडे खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून उकळली खंडणी, गुन्हे शाखेतील पोलिसावर FIR

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?