Crime Branch Police | कपडे खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून उकळली खंडणी, गुन्हे शाखेतील पोलिसावर FIR

ठाणे / नौपाडा : पोलीसनामा ऑनलाइन –  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन व्यापाऱ्याकडून 19 हजार रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Police) पोलिसाविरुद्ध खंडणीचा (ransom) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र जयसिंग पाटील (Rajendra Jaysingh Patil) यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात (Naupada Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पाटील गुन्हे शाखा युनिट एकमध्ये (Crime Branch Police) कार्यरत असून त्यांनी व्यापाऱ्याकडे दीड लाखाची मागणी केली होती.

 

याप्रकरणी रबाडी येथील 41 वर्षीय व्यापाऱ्याने नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट एकमध्ये कार्यरत आहेत.
त्यांनी फिर्यादी यांना वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी 9 हजार रुपये रोख रक्कम घेतली.
तसेच कपडे (clothe) खरेदी करण्यासाठी 10 हजार असे एकूण 19 हजार रुपये खंडणी घेतली.

 

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 मधील पोलीस राजेंद्र पाटील यांच्या वर नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने ठाणे पोलीस दलात (Thane Police Force) खळबळ उडाली आहे. पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Crime Branch Police | Boiled ransom from merchant for buying clothes, FIR on crime branch police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Falguni Nayar | नोकरी सोडून 50 व्या वर्षी सुरू केला कॉस्मेटिकचा बिझनेस, 9 वर्षात बनल्या अरबपती; एका तिमाहीत विकली 20 कोटी डॉलरची उत्पादने

Kirit Somaiya | ‘ठाकरे सरकारची माफियागिरी, मलिक वानखेडेंना मुस्लिम म्हणतात तर मुश्रीफ….’

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?