PMPML E-Bus | किल्ले सिंहगडावर ई-बसची चाचणी, वन विभागाकडून अटींची पूर्तता न केल्याने प्रतिक्षा करावी लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किल्ले सिंहगडावर (Sinhagad Fort) जाण्यासाठी पुन्हा ई-बस (PMPML E-Bus) सुरु केली जाणार आहे. त्यासाठी पीएमपीच्या (PMP Pune) अधिकाऱ्यांनी गडावर जाऊन पाहणी केली. यानंतर गाडीची चाचणी घेण्यात आली. मात्र, वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी योग्य अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे अद्याप तरी पीएमपी बस (PMPML E-Bus) चालवण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

 

किल्ले सिंहगड येथे जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालताना ई-बस सेवा सुरु करण्यात आली होती. यासाठी ई-बस चार्जिंग सुविधाही विकसित करण्यात आली होती. तसेच डोणजे येथे वाहनतळ विकसित करण्यात आले होते. पर्यटकांचाही या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत होता. परंतु अरुंद रस्ता, दरड कोसळण्याच्या घटना, अपुरी चार्जिग स्थानके आणि अपघातांमुळे ही सेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. कारण तिथे बसला वळविण्यासाठी योग्य ते बदल घाटात करण्यात आले नाहीत. त्यामुळे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी बदल करा, त्यानंतरच बस सेवा सुरु करु, असे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पाहणी केल्यानंतर पीएमपी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून घाट रस्त्याची पाहणी करण्यात आली. नव्याने चार्जिंग स्थानके उभारण्यात आल्यानंतर आणि पायाभूत सुविधा विकसित केल्यानंतर ही बस सेवा पूर्ववत सुरु करण्याचे संकेत पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 

 

Web Title :  PMPML E-Bus | e-bus trial at sinhagad as the conditions are not met we will have to wait

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme