PMRDA-Illegal Constructions-Gunthewari | पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमीत होणार ! 31 मे पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे पीएमआरडीएचे आवाहन

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील नागरिकांनाही होणार लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMRDA-Illegal Constructions-Gunthewari | पिंपरी चिंचवड (PCMC) आणि पुणे महापालिके (Pune Corporation) पाठोपाठ पीएमआरडीएच्या (PMRDA) क्षेत्रात ३१ डिसेंबर २०२० पुर्वी झालेली अनधिकृत बांधकामे (Illegal Constructions) गुंठेवारी कायद्यानुसार (Gunthewari Act) नियमीत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुंठेवारी अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी संबधित मिळकतधारकांनी (Property Owner) लायसेन्स आर्किटेक्ट (Licensed Architect) अथवा इंजिनिअरच्या (Engineer) माध्यमातून ३१ मे २०२२ पर्यंत पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात (PMRDA Akurdi Office) प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे (PMRDA Commissioner Suhas Divase) यांनी केले आहे. या योजनेचा लाभ पुणे महापालिकेत वर्षभरापुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसह पीएमआरडीएच्या ७ हजारहून अधिक चौ.कि.मी. परिसरातील अनधिकृत बांधकामांना होणार आहे. (PMRDA-Illegal Constructions-Gunthewari)

 

प्रस्ताव दाखल करताना अलिकडचा सातबारा उतारा, तो नसल्यास इंडेक्स २, खरेदीखत, नोंदणीकृत साठेखत, विहित नमुन्यातील हमीपत्र, वरील कागदपत्र नसतील तर कुलमुखत्यारपत्र,मिळकतकर भरल्याची पावती, वीज बिल, मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखडा नकाशानुसार रेखाकला विभागाकडील अभिप्राय, बांधकाम ३१ डिसेंबर २०२० पुर्वीचे असल्याबाबतचे गुगल मॅप नकाशा, मोजणी नकाशा, इमारतीचा प्लान, उंचीचा दाखला, पाणी पुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध असणेबाबत व वरील सर्व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत ५०० रुपयांच्या स्टँम्पवरील हमीपत्र प्रस्तावासोबत जोडावे लागणार आहे. (PMRDA-Illegal Constructions-Gunthewari)

ही बांधकामे नियमीत होणार नाहीत
रेड झोन, बफर झोन, हिल टॉप हिल स्लोप झोन, शेती तथा नाविकास झोन, वनीकरण झोन, शासकिय अथवा खाजगी वने, पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षणे, नदी पात्र, सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे, मोकळे भूखंड तसेच अंशत: बांधकाम नियमीत केली जाणार नाहीत.

 

Web Title :- PMRDA-Illegal Constructions-Gunthewari | Illegal Constructions within the limits of PMRDA will be regularized under Gunthewari! PMRDA appeals to submit proposals by May 31

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ganesh Bidkar | गणेेश बिडकर यांचा यापुढील पुणे महापालिकेच्या कामकाजातील नोंद ‘सभागृह नेता’ नव्हे तर भाजपचे ‘गटनेता’ म्हणून होणार

 

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात