PMRDA | ‘पीएमआरडीए’ च्या प्रारूप विकास योजनेवरील हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) प्रारुप विकास योजना (Development Plan) ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. पीएमआरडीएच्या (PMRDA) प्रारुप विकास योजनेवर प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर लवकरच सुनावणी (Hearing) घेतली जाणार आहे. यासाठी महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee) गठीत करण्यात आली आहे. (PMRDA)

 

पीएमआरडीएच्या (PMRDA) प्रारुप विकास योजनेवर हरकती (Objections) व सूचना (Suggestions) मागवण्यात आल्या होत्या. PMRDA कडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर 5 मे ते 6 मे 2022 तसेच 9 मे या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1.30 आणि 2.30 ते 5 या वेळेत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी खडकवासला विकसन केंद्र (Khadakwasla Development Center) आणि सासवड विकसन केंद्रातील (Saswad Development Center) गावांसाठी होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त (Metropolitan Commissioner) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी दिली आहे.

खडकवासला विकसन केंद्रामधील गावे
1) भिलारेवाडी (Bhilarewadi) 2) नांदोशी (Nandoshi) 3) किरकटवाडी (Kirkatwadi) 4) सणसनगर (Sanasnagar) 5) निंबाळकरवाडी (Nimbalkarwadi) 6) खडकवासला 7) नांदेड (Nanded) 8) मांगडेवाडी (Mangdewadi) 9) जांभुळवाडी (Jambhulwadi) 10) कोळेवाडी (Kolewadi) 11) नऱ्हे (Narhe) 12) कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavde) 13) कोपरे (Kopare)

 

सासवड या विकसन केंद्रामधील गावे
1) अंबोडी (Ambodi) 2) काळेवाडी (Kalewadi) 3) गूऱ्होळी (Gurholi) 4) कुंभारवळण (Kumbharwalan) 5) दिवे (Dive) 6) सिंगापुर (Singapore) 7) सोनोरी (Sonori) 8) वनपुरी (Vanpuri) 9) पवारवाडी (Pawarwadi) 10) झेंडेवाडी (Zendewadi) 11) उदाचीवाडी (Udachiwadi) 12) जाधववाडी (Jadhavwadi) या गावांकरिता 10 मे ते 12 मे 2022 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 1.30 व दुपारी 2.30 ते 5 या कालावधीत हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन (Akurdi Railway Station) जवळ, आकुर्डी येथे सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यातत आला आहे.

 

अर्जदारांनी सुनावणीस हजर राहण्याचे आवाहन
प्रारुप विकास योजनेवर विहीत वेळेत सूचना, हरकत सादर केलेल्या अर्जदारास, सुनावणीबाबतचा सविस्तर तपशिल रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात आला आहे.
तसेच हा सविस्तर तपशिल हा प्राधिकरणाच्या www.pmrda.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्या अर्जदारांस रजिस्टर्ड पोस्ट /एसएमएस द्वारे नोटीस प्राप्त झालेली नाही,
अशा अर्जदारांनी सदरची जाहीर नोटीस ही नोटीस समजून सूनावणीच्या सविस्तर तपशिलानुसार सुनावणीस हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- PMRDA | PMRDAs objections to draft development plan hearing on suggestions soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा