हुल्लडबाजांची धुळवड पोलिस ठाण्यातच

८४ तरुणांवर वाकड पोलिसांची कारवाई

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – वाकड परिसरात महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडील वाहने जप्त केली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करीत असताना चौकामध्ये ये-जा करणाऱ्या महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाचा उद्योग काही तरुण करीत होते. दुचाक्या दामटत ही मुलं हुडल्लडबाजी करीत होती.

होळी, धुळवड म्हंटले की तरुणांची हुल्लडबाजी आलीच. शाळा, कॉलेजसमोर तसेच चौका-चौकात थांबून तरुण हुल्लडबाजी करतात. यामुळे विशेषता महिलांमध्ये भितीचे वातावरण असते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ठोस निर्णय घेतला.
वाकड पोलिसांनी ९ पथके तयार करुन, चौका – चौकात तसेच महाविद्यालयच्या आजुबाजूला थांबून ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई केली आहे. ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी असणारे हे पथक आज संध्याकाळपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताब्यात घेतलेल्या तरुणांना आज दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडील चारचाकी आणि दुचाकी वाहनं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याचसोबत याबाबत या तरुणांच्या पालकांना याची माहिती दिली जाणार आहे.

You might also like