क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेणारा पोलिसांच्या जाळ्यात 

अकोला:पोलीसनामा ऑनलाईन

आशिया क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसला तरी सट्टाबाजांमध्ये चालती होती. शुक्रवारी रात्री झालेल्या भारत विरुद्ध बांगला देश यांच्यातील सामन्यात देशभरात मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्यात आला होता, असे बोलले जात असतानाच अकोला येथील राधाकिसन प्लॉटमध्ये चाललेल्या सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. महेश महावीरप्रसाद अग्रवाल (वय ४७, रा. न्यू राधाकिसन प्लॉट) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a96b7e6-c3a8-11e8-a93e-bf5f190aa824′]

काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अकोल्यातील प्रतिष्ठीत घरातील व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी छापा टाकून काही जणांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवस येथील जुगार बंद झाला होता. आता त्याच ठिकाणी क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याचे आढळून आले आहे.

कुख्यात गुन्हेगारांनी पेट्रोल टाकून पेटवले शेजाऱ्याचे घर

न्यू. राधाकिसन प्लॉट येथे क्रिकेट सट्टा लावण्यात येत असल्याच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे अंमलदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे टिव्हीवर क्रिकेट सामना लावून महेश अग्रवाल हा सट्टा घेत असल्याचे आढळून आले होते.

[amazon_link asins=’9380386788′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49d2efed-c3a9-11e8-bb76-bf776d47a0f5′]

पोलिसांनी अग्रवाल याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून पोलिसांनी १ मोबाईल, एल सी डी टीव्ही, २ सेट टॉप बॉक्स, १ हजार रुपये रोख असा एकूण ३६ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई कोतवाली पोलिस ठाण्याचे अंमलदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश जायभाय, प्रमोद डुकरे, ज्ञानेशवर रडके, नागसेन वानखडे, अमित दुबे यांनी केली.