दुचाक्या चोरणारी टोळी यवत पोलीसांकडून जेरबंद, 9 दुचाकी हस्तगत

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – यवत पोलीस स्टेशन हददीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यवत पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चोरांना पकडण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

या सूचनेनुसार यवतचे पोलीस नाईक बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल पंडीत हे मंगळवार दि.०७ जानेवारी रोजी सकाळी पुणे सोलापुर  हायवे रोडवर पेट्रोलींग करीत असताना. यवत रेल्वेस्टेशन रोडवर दोन इसम मोटार सायकलवर रेल्वे स्टेशनकडे जाताना त्यांच्या गाडीला मागे नंबर प्लेटवर चिखल लावलेला दिसल्याने त्यांना संशय आला. यावेळी पोलीसांनी मोटारसायकल स्वरांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी पोलीसांना पाहताच मोटार सायकल जोरात पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर जाऊन पकडत  त्यांना नाव, पत्ता तसेच गाडीचे पेपरबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना यवत पोलीस स्टेशन येथे आणुन विचारपुस करताच त्यांनी सदरची गाडी ही सहजपुर, थोरातवस्ती येथुन चोरलेली असल्याचे सांगुन अश्या बऱ्याच वेगवेगळया ठिकाणाहुनही ९ मोटार सायकल चोरल्या असल्याचे कबूल केले.

आरोपींनी आपले नावे बाल उत्तम शिंदे. वय. ३२ वर्षे. रा. कोरेगांव भिवर, ता. दौंड, जि. पुणे. व सोमनाथ आनंदा शिंदे, वय. ३४ वर्षे, रा. कोरेगांव भिवर, ता. दौंड, जि. पुणे. अशी सांगितली असून या दोन्ही आरोपींवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन दौंड न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. चोरलेल्या ९ मोटार सायकलींची अंदाजे किंमत ही २ लाख रुपये आहे.

ही कारवाई यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस नाईक दशरथ बनसोडे, बनकर,पोटे, संतोष पंडित,विषाल गजरे, विनोद रासकर, नारायण जाधव पोलिस होमगार्ड नवनाथ वेताळ यांच्या पथकाने केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/