४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हिरादास सुखदेव पिल्लारे (वय-४७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्यात आज (बुधवार) करण्यात आली.

तक्रारदार यांचा मुलगा व इतर दोघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिल्लारे याने तक्रारदार यांच्या मुलाला २ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी त्याला अटक करण्याची धमकी दिली. तसेच अटक झाल्यावर लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच पिल्लारे याने मागितली. मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले. तक्रारदार यांनी १४ जुलै रोजी पिल्लारे याची भेट घेतली. त्यावेळी त्याने तक्रारदाराला ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तडजोडीत चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने आज सापळा रचून पिल्लारे याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील,पोलीस कर्मचारी रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन व चालक देवानंद मारबते यांनी केली. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like