Police Constable Committed Suicide | पोलीस हवालदाराची राहत्या घराच्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Police Constable Committed Suicide | गोंदिया पोलीस (Gondia Police) दलातील एका पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Police Constable Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश भुरे (Mahesh Bhure) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील देवरी येथे आज सकाळच्या सुमारास घडली आहे. महेश भुरे हे देवरी पोलीस उप मुख्यालयात (Deori Police Sub Headquarters) कर्यारत होते.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासात पोलीस हवालदार महेश भुरे हे गेल्या तीन वर्षापासून गंभीर आजाराने (Serious Illness) ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना असह्य त्रास सोसावा लागत होता. अखेर हा त्रास सहन न झाल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

 

पोलीस हवालदार महेश भुरे हे 2020 पासून गंभीर आजाराने ग्रस्त होते.
आजाराच्या सततच्या वेदना त्यांना असह्य होत असल्याने काल रात्री देवरी येथे राहत असलेल्या घरातील व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आज सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात (Deori Police Station) करण्यात आली आहे.

 

Web Title :- Police Constable Committed Suicide | police constable commits suicide in gondia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

 

Pune Crime | 8 महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक