पोलीस काँस्टेबलने गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींवर घातल्या गोळ्या

लखनौ : वृत्तसंस्था

अ‍ॅपलचे मॅनेजर विवेक तिवारी यांच्या गाडीच्या बोनटवर चढून पोलीस काँस्टेबलने गोळी झाडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्याला शवविच्छेदन अहवालात पुष्टी मिळाली आहे. आतापर्यंत पोलिसांनी सातत्याने काँस्टेबल प्रशांत चौधरीने स्वरंक्षणासाठीगोळी झाडल्याचा दावा केला आहे. प्रशांत यानेही जबाब देताना म्हटले होते की, गाडीची धडक बसून खाली पडलो होतो. त्यावेळी विवेक आपल्या अंगावर गाडी चढवेल अशी भिती होती त्यामुळेच आपण सर्व्हिसरिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्याचे म्हटले होते. पण, विवेक तिवारी यांच्या शवविच्छेदन अहवालात पोलिसांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे. डॉ. जितेंद्र श्रीवास्तव आणि प्रवीण कुमार शर्मा यांच्या टीमने विवेक तिवारी यांचे शवविच्छेदन केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a86178f5-c600-11e8-aeea-43d989c6f3cd’]

शवविच्छेदन अहवालानुसार विवेक तिवारींच्या शरिरात मारलेली गोळी ही वरुन खाली गेली आहे. म्हणजेच कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने समोरुन वरच्या बाजूने विवेक यांना गोळी मारली. प्रशांतला कोणतीही दुखापत झाली नव्हती. ना ते गाडीच्या धडकेने खाली पडले होते. कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने विवेक यांना अत्यंत जवळून गोळी मारल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही गोळी त्यांच्या शरीरातच रुतली होती. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना गोळ्या घातल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारण गोळी जर रस्त्यावरून मारली असती तर वरून शरीरात खालपर्यंत गेली नसती. अहवालानुसार, विवेकच्या चेहºयाच्या डाव्या बाजूला ब्लँक रेंजमध्ये गोळी मारण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात विवेक यांची पत्नी कल्पना तिवारी यांनी एफआयआर दाखल केले असून, कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी गाडीच्या काचेतून पिस्तूल ताणून गोळी मारल्याचे म्हटले आहे.

आज औरंगाबादेत एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाची सभा

२८ आणि २९  सप्टेंबरच्या रात्री विवेक यांना गोळी मारण्यात आली होती. अ‍ॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर विवेक तिवारी हे आपली सहकारी सना हिला सोडण्यासाठी घरी जात होते. रात्री दीडच्या सुमारास गोमतीनगर परिसरात पोलिसांनी त्यांना गोळी मारली.

या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यस्थी करून विवेक तिवारीच्या कुटुंबीयांना मदत केली होती. तसेच बसपाच्या मायावतींनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचेही मायावती म्हणाल्या होत्या.

[amazon_link asins=’B07DKNGGVG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbf475fb-c600-11e8-81bd-cbff2c4043a2′]

विवेक तिवारी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरात उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याची टिका होऊ लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर एन्काऊंटर करण्यास सुरुवात केली होती. त्यातून पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्यात दहशतवादी समजून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेले विवेक तिवारी हे अ‍ॅपलचे मॅनेजर असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे.

जाहिरात