सामान्य नागरिक सुद्धा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘पोलिस मित्र’ ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षा पासून चालू आहे. पण सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करण्यासाठी आता ‘पोलीस मित्र’ सुध्या या मैदानात उतरणार आहे. वसई मधील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणत प्रतिसाद देत तब्बल दहा हजार नागरिकांनी ‘ पोलीस मित्र ‘ होण्याचा निर्णय घेतला आहे. या मध्ये महिलांनी देखील मोठा सहभाग घेतलेला दिसून येतो.

जवळपास दोन हजार महिलांचा यात समावेश आहे,  तसेच महाविदयातील तरुण -तरुणी आणि जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या संपूर्ण फौजफाटय़ामुळे वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिबरोबर इतर गुन्हेगारी कृत्यांना सुध्या चांगलाच लगाम बसणार आहे .आणि पोलीस दलाला देखील चांगली मदत होणार आहे.

वसईतील सर्क पोलीस ठाण्यांना एका महिन्यात दहा हजार ‘पोलीस मित्र’ बनवण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिले होते. सध्या अडीच हजार ‘ पोलीस मित्र ’ पोलिसांना कामात मदत करत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या तसेच वाढते गुन्हे लक्षात घेता, या मध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या हि फार कमी होती . यावर पर्याय म्हणून ‘ पोलीस मित्र ‘ हि संकप्लना अधिक मोठ्या प्रमाण राबवून यामध्ये चांगल्या नागरिकांची पोलिसांच्या कामात मदत करून घेण्याचे ठरवले आहे. या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी काही दिवसांपूर्वी  पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले होते.

त्यानुसार तब्बल दहा हजार तरुणांनी याला प्रतिसाद देत ‘ पोलीस मित्र’ होण्याचा निर्णय घेतला आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुरुवारी या सर्व ‘पोलीस मित्रां’ची कार्यशाळा झाली. त्यावेळी उपस्थित ‘ पोलीस मित्रां’ ना अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांच्या विविध कामात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी ही संकल्पना राबवली जात असते. सध्या 10250 ‘पोलीस मित्रां’ची नोंदणी झाली आहे. यांची संख्या वाढवणार आहोत. त्यांच्याशी व्हॉट्सऍप ग्रूपच्या माध्यमातून पोलीस संपर्कात राहणार आहेत. विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक