पोलीस चौकीतच पोलिसाला मारहाण, शिवीगाळ, धमकीचे २ प्रकार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – सांगवी येथे पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. तर वाकड पोलीस ठाण्यात पोलिसाला शिवीगाळ करून धमकी देण्यात आली.

वाकड पोलिसांकडे कोहिनुर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सताराम यादव यांनी ते काम करत असलेल्या हॉटेलचा भागीदार मालक सुरज देविदास कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉटेलचा दुसरा भागीदार आरोपी इम्तियाज याला पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत सर्व पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. यावरून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी इम्तियाज बरकतअली आत्तार (३४, रा. परमवीर कॉलनी, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. तर पोलीस नाईक महेश विनायकराव बारकुले (३५) यांनी वाकड फिर्याद दिली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे (४८, रा. बॉडिगेट पोलीस लाईन, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर साहेबगौडा वामदेव पाटील (४८, रा. संकल्प सिद्धी अपार्टमेंट, शितोळे नगर, जुनी सांगवी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सुपे नवी सांगवी पोलीस चौकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते कर्तव्यावर असताना पाटील चौकीत आला. त्याने त्याच्या मुलाची तक्रार का घेतली नाही म्हणून सुपे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच छातीवर व तोंडावर मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.