पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हा पोलीस दलाकडील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, पाच सहाय्यक निरीक्षक, दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी रात्री दिले आहेत.

इस्लामपूरच्या निरीक्षकपदी संदीप कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता व्ही. एच. साळोखे यांची इस्लामपूरला बदली करण्यात आली असून कोळेकर यांची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली आहे. आष्ट्याचे निरीक्षक एम. बी. पाटील यांची नियंत्रण कक्षाकडे तर एस. ए. जमादार यांची आष्ट्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d544293b-7c28-11e8-992f-d597924a8936′]

सहाय्यक निरीक्षक के. व्ही. पाटील यांची संजयनगर पोलीस ठाण्याकडे तर चिंचणी-वांगी ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक एम. पी. सोनवलकर यांची विश्रामबागला बदली करण्यात आली आहे. व्ही. बी. जाधव यांची एएचटीयूकडे बदली करण्यात आली आहे. एम. एस. काळगावे यांची इस्लामपूरला तर जी. एम. देशमुख यांची मिरज शहराकडे बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक आर. के. कसबेकर यांची कुपवाड एमआयडीसीकडे तर ए. व्ही. पाटील यांची आष्ट्याला बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांनी त्वरीत बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.