Sangli News : सांगलीतील हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; ‘रेड’ टाकणार्‍यांचे डोळे फिरले, ‘रंगेल’ पोलिस निरीक्षक अन् कॉलगर्लची ‘मज्जा’ ? पीआयला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली शहरामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने सांगली पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस निरीक्षक देवकरसह सहा जाणांना अटक करण्यात आली आहे. अरुण देवकर हे आटपाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

हॉटेल रणवीरमध्ये हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पोलिस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांना अटक करुन दोन पीडीत तरुणींची सुटका केली. याप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, अरुण देवकर, सत्यजित पंडीत अशी अटक करण्यात आलेल्या आरपींची नावे आहेत. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. कर्नाळ येथील हॉटेल रणवीर येथे वेश्यालय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पथकाने छापा टाकून कारवाई केल.  दरम्यान, वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलीस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यासह सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अरुण देवकर हे आटपाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.