रावेतमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक, 5 महिलांची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रावेत येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. येथील स्पा सेंटरवर मंगळवारी (दि.10) दुपारी छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून 5 महिलांची सुटका केली आहे.

या प्रकरणी स्पा सेंटरचा चालक आणि मालक अमोल दत्तात्रय नवले (वय 29, रा. चाकण), तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर आकाश अनिल सोनवणे (वय 24, रा. थेरगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. 9) दुपारी त्याठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी 5 महिलांची सुटका करून आरोपींना अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.