Police Patil Suspended | इंदापूर तालुक्यातील एका गावच्या राजकारणात भाग घेणं पडलं महागात, गावचा पोलीस पाटील निलंबित

इंदापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Police Patil Suspended | गावतील राजकारणात भाग घेणे पोलीस पाटलाला चांगलेच महागात पडले आहे. इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी गावच्या पोलीस पाटलावर निलंबनाची (Police Patil Suspended) कारवाई करण्यात आली आहे. नंदकुमार लावंड (Nandkumar Lavand) असे निलंबित केलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी (Baramati Sub-Divisional Officer) नंदकुमार लावंड यांच्यावर ही कारवाई केली आहे.

घोरपडवाडी येथील गजानन लंबाते यांच्यासह इतरांनी 22 जून 2019 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लावंड यांच्या विरोधात तक्रार केली होती.
तसेच लवांड यांच्यावर कारवाई झाली नाही तर आत्मदहन करु असा इशारा दिला होता.
यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांनी नंदकुमार लावंड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

निर्णयाविरोधात ‘मॅट’मध्ये जाणार

नंदकुमार लावंड यांनी सांगितले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही चौकशी केली नाही.
केवळ राजकीय दबावापोटी हा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ‘मॅट’मध्ये जाणार आहे.
तसेच निर्णयाची सखोल चौकशी व्हावी म्हणून न्यायालयात याचिका (Petition) दाखल करणार असल्याचे लावंड यांनी सांगितले.

लावंड यांनी गावातील राजकारणात प्रचार केलेले संभाषण प्राप्त झाले होते.
यामुळे कारवाई करण्यात आली आहे. पुढील चौकशीचे आदेश वालचंदनगर पोलीस ठाण्याचे (Walchandnagar Police Station) सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार (API Dilip Pawar) यांना दिले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

Web Title : Police Patil Suspended | police patil has suspended for participate in politics of village

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona Restrictions | पुणे व्यापारी महासंघाचा इशारा, अजित पवारांनी निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून…

PM Mandhan Yojana | केवळ 55 रुपयांची बचत केल्यानंतर मोदी सरकार दरमहिना देईल 3000 रुपये, जाणून घ्या

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला