लष्कर भागात हुक्का पार्लरवर छापा; तर कोंढव्यात कोकेनसह नायजेरियनला पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी लष्कर परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. तर कोंढव्यात नायजेरियन तरुणाकडून कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

लष्करला छापा टाकून साजीद शेख हसन (वय ४०, रा. कॅम्प) याला पकडले आहे. त्याच्या दुकानातून १ लाख ५२ हजार ५५० किंमतीचा हुक्का फ्लेवरसह ऐवज जप्त करण्यात आला आहे. लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.

तसेच कोंढव्यात कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरिन तरुणाला अमंली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोकेनसह २ लाख ७ हजारांचा ऐवज आज जप्त केला. नादी ओडीनाका हेंद्री (वय ३४ .रा. मॅजेस्टिक सोसायटी, कोंढवा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/