पोलिसांची तत्परता व सामान्य नागरिकाचा प्रामाणिकपणा; युवतीने मानले आभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज (मंगळवार) सकाळी कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या कोथरुड येथे त्यांच्या चुलत आजोबांचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपून पुणे कॅम्प येथील ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या. दुचाकीवरुन जाताना दु:खद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली. परंतू, ऑफिसला जाण्याच्या गडबडीत त्यांना समजले नाही. ऑफिसला गेल्यावर त्यांना पर्स हरवल्याचे व त्यामधे काही रक्कम, मोबाईल फोन, महत्वाची बँकेची कार्ड व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडाने ऑफिस बाहेर येऊन आले त्या दिशेने शोध घेत जायचे ठरवले.

[amazon_link asins=’B0776GLS3X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a19ea65-7ed7-11e8-bd24-6d40f1d79b0d’]

नशीब चांगले म्हणून समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील वाहतूक पोलीस विठ्ठल छल्लारे यांची भेट समर्थ पोलीस ठाण्याजवळ झाली व गंधाली यांनी घाबरतच झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. लगेचच समर्थ पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस सचिन जाधव यांनी गहाळ झालेल्या मोबाईल वर संपर्क साधला. तेव्हा अनिल मोरे हे गृहस्थ यांनी “पर्स मला सापडली असून मी फोनची वाटच पाहात होतो” असे सांगितले.

अखेर पोलीस शिपाई जाधव यांनी गंधाली यांच्या बरोबर जाऊन फरासखाना येथे आलेले अनिल मोरे यांच्याकडून पर्स घेऊन गंधाली यांच्या ताब्यात दिली. पर्समधे सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन एका तासातच त्यांना पर्स परत मिळाली याचा आनंद झाला. गंधाली यांनी अनिल मोरे यांच्या माणूसकीचे व पोलिसांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याचे आभार मानले.