नाशिकमध्ये 70 किलो ड्रग्जसह दोघांना बेड्या

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन
नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत पाॅपी स्ट्राॅ म्हणजेच बुक्की पावडर नावाने अोळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थासह दोघांना बेड्या ठोकल्या आहे. सुरेंद्र पालसिंग आणि रतन मोराडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सर्वात गंभीर म्हणजे ड्रग्स आणि गांजा पेक्षाही बुक्की पावड घातक असल्यामुळे या दुर्मिळ ड्रग्जला मोठी मागणी असते.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3f4dfd0-9a24-11e8-a8ca-276d64680819′]
शहरात तब्बल 70 किलो पाॅपी ड्रग्ज सापडला आहे. नाशिक पोलिसांच्या युनिट एकच्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. जप्त केलेल्या मालाची किंमत साडेतीन लाखांहून अधिक आहे. यावेळी पाॅपी ड्रग्स आणि राॅ मटेरियल मिळून 103 किलो मुद्देमाल जप्त केला आहे.डगाव नाका परिसरातील मुंबई आग्रा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. शहरामध्ये या अमली पदार्थाची विक्री करणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.