मर्जितील पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या अटळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

कामात हलगर्जीपणा, तक्रारदारांना नाहक त्रास देणाऱ्या तसेच एखाद्या वरिष्ठांच्या मर्जित आहे म्हणून  ‘चॉइस पोस्टिंग’ मिळालेल्या उपनिरीक्षक (PSI) किंवा सहायक पोलिस निरीक्षक (API) यांची बदली अटळ आहे. कारण थेट पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांच्या मुलाखती घेणे सुरू केले असून त्यांच्या आता पर्यतच्या कामाचा अहवाल तपासून नवीन ‘पोस्टिंग’ दिले जाणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03a1d632-c5f4-11e8-9796-975ba645529e’]

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची घडी बसविण्यासाठी पोलीस आयुक्त वेगवेगळ्या प्रकारे उपाय योजना राबवत आहेत. त्यातच नागरिकांना पोलिसांकडून त्रास होणार नाही याकडे त्यांचे लक्ष आहे. मनुष्यबळ कमी असताना देखील त्यातच चांगले काम करण्याचे मोठे आवाहन त्यांनी स्वीकारले आहे. आयुक्तालय झाल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या वागण्यामुळे पोलीस खाते चव्हाट्यावर आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच फेरबदल करायचे असल्याने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सोमवार १ ऑक्टोबर रोजी पिंपरी विभागातील पाच पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या फौजदार-सहाय्यक निरीक्षकांशी थेट संवाद साधला. ते कार्यरत असलेल्या ठिकाणी किती काळ आहेत, त्यांनी आता प्रयत्न कोणती कामगिरी केली, नव्याने होणाऱ्या फेरबदलामध्ये कोणत्या ठिकाणी जाण्यास इच्छुक आहेत याची आणि इतर चर्चा केली.

तीन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

यापुढे चार दिवस याच पद्धतीने पिंपरी-चिंचवड शहरातील फौजदार-सहाय्यक निरीक्षकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नियुक्ती आणि त्यामागचा वशिला यावरून पोलिस दलावर कायमच टिका केली जाते. मर्जितला अधिकारी किंवा अमुक एखाद्याने सांगितले म्हणून चॉइस पोस्टिंग हे प्रकार सर्रासपणे होताना दिसतात. अधिकारी कोणत्या धाटणीतला आहे. तो नागरिकांशी कोणत्या प्रकारे वागतो हे जाणून घेताना एखाद्याबाबत कोणताही पूर्वग्रह नसावा या उद्देशाने आयुक्त पद्मनाभन यांनी शहरातील सर्व फौजदार-सहाय्यक निरीक्षकांशी संवाद साधण्यास सुरवात केली. यापुढे पोलिस आयुक्तालयात कार्यारत असलेल्या सर्व पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B014HWDD8W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d616988-c5f4-11e8-8669-855401adf7d5′]

पिंपरी विभागानंतर वाकड विभाग, देहूरोड विभाग, चाकण विभागातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या आणि विविध विभागात नियुक्तीस असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच नागरिकांच्या प्रश्नांना आणि अडचणी अधिकारी कोणत्या प्रकारे सोडवितो हे याव्दारे तपासले जात आहे. अनेकांना त्यांना हवे त्या ठिकाणी नियुक्त करून, नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न असल्याचे आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.

Loading...
You might also like