देवेगौडा म्हणाले मी हि ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आहे 

बँगलोर : कर्नाटक वृत्तसंस्था – ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होण्याने जे वाद निर्माण झाले आहेत. त्या वादाचा पदर पकडून दिवेगौडांनी मोठा गौप्यस्फोट घडवला आहे. त्यात ते म्हणाले आहेत कि मी हि  ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आहे. संजय बारू लिखित  ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाच्या कथेवर आधारित  असलेला चित्रपट ११ जानेवारी २०१९ ला येऊ घातला आहे. त्याच पार्श्वभूमी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आपल्या कार्यकालावर गौप्यस्फोट केला आहे.

१९९६ साली झालेल्या  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही त्यानंतर सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रपतींनी अटल बिहारी  वाजपेयी यांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केले. अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत आपल्या बाजूने बहुमत सिद्ध करू शकले नाहीत म्हणून त्यांनी १३ व्या दिवशी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संयुक्त मोर्चा म्हणून काही पक्षांच्या एक करून आणि काँग्रेसच्या पाठींब्यावर एच डी देवेगौडा पंतप्रधान झाले. त्यांच्या कार्यकाळाला हि काँग्रेसच्या हेकेखोर राजकारणाचा दंश झाला आणि ते हि पाच वर्षाच्या नियोजित कार्यकाळ समाप्ती पूर्वीच सत्ता उतार झाले. या गोष्टीचे शैल्य कोणत्याही नेत्याच्या मनात आयुष्य भर राहूच शकते परंतु देवेगौडा यांना त्या गोष्टीचे शैल्य अधिक असेल कारण त्यानंतर ते कधीच पंतप्रधान होऊ शकले नाहीत. तसेच त्यांचा पक्ष कधीही सत्तेच्या जवळ पास हि गेला नाही. म्हणूनच दिवेगौडा म्हणाले असतील कि मी हि ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च आहे.एच डी देवेगौडा यांचा कार्यकाळ १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ पर्यंत होता. ते अवघ्या १० महिन्याचे पंतप्रधान बनले होते.

११ जानेवारी २०१९ रोजी येऊ घातलेल्या  ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचे निर्देशन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले असून त्यात मनमोहन सिंग यांची भूमिका जेष्ठ सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी निभावली असून संजय बारू यांची भूमिका विनोद खन्ना यांनी निभावली आहे. २००४ ते २००८ पर्यंत संजय बारू हे मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम बघत होते. तर ते मनमोहन सिंग यांच्या संपर्कात पंतप्रधान पदावरून पाय उतार होई पर्यंत होते. संजय बारू यांनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच प्रकाशित केले होते. तेव्हा नरेंद्र मोदी आणि भाजपला या पुस्तकाच्या रूपाने  प्रचारासाठी आयते कोलीत हाती मिळाले होते.