राज्यात पुन्हा काका – पुतण्यात ‘लढाई’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणाला काका पुतण्या वाद नवीन नाही. महाराष्ट्र्रात याबाबतची अनेक उदाहरणे आपल्याला माहित आहेत, मात्र बीड जिल्ह्यातील काका पुतण्या वाद आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणातही बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या काका पुतण्यात वाद रंगला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि शिवसेनेचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्र्राला माहित आहे.

त्यानंतर आता जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संदीप यांचे राष्ट्रवादीतील वजन वाढल्याचे काल पुन्हा पाहायला मिळाले. बीड विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत संदीप क्षीरसागर यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा काका- पुतण्याची लढाई पाहायला मिळणार आहे.

संदीप क्षीरसागर यांना आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांना तयारीला लागण्याचे आदेश देऊन बळ दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोण कुणावर भारी पडतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संदीप हे सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.दरम्यान, लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.

अनेकदा तक्रार करून देखील पक्षश्रेष्ठी आपल्या गोष्टीची दखल घेत नसल्याचे बोलून दाखवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचे अजिबात पटत नव्हते . त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी सोडली असेदेखील बोलले जात होते.

आरोग्य विषयक वृत्त

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

Loading...
You might also like