Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड यांच्याविरूध्द FIR दाखल करा ! ‘भाजप’च्या स्वरदा बापट यांच्याकडून तक्रार अर्ज तर राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता भाजपच्या वतीनेच तक्रार देण्यात आली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनी आज तक्रार केली आहे. तसेच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, भाजपयुमोचे राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली वानवडी पोलिस ठाण्याच्या बाहेर मंत्री संजय राठोड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले.

परळीच्या पूजा चव्हाण या तरुणीने पंधरा दिवसांपूर्वी वानवडी परिसरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यात भाजपने शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. पूजा हिचे हत्यारे राठोडच असल्याचे म्हंटले आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आज भाजपच्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांची भूमीका संशयास्पद असून, त्यांच्याकडून तपास काढून घेत तो एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला द्यावा अशी मागणी केली. तर पुणे पोलीस तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करत नसल्याचे सांगत असून, टाळाटाळ करत असल्याचे म्हंटले आहे.

यानंतर स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस ठाण्यात आंदोलन करत मंत्री संजय राठोड यांच्या नावाने तक्रार करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे म्हंटले आहे. पोलीस तक्रार नसल्याचे सांगत असल्याने आम्ही तक्रार दिली आल्याचे त्या म्हणाल्या आहेत. बापट यांनी केली…

इतके दिवस या प्रकरणात कोणी तक्रार दिली नाही म्हणून तपासाला मर्यादा येत असल्याचे पोलिस सांगत होते परंतु आता तक्रार अर्ज झाल्याने पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करून 18 दिवस होत आले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा. अशी मागणी भाजपकडून सतत होत आहे. तर त्याच दरम्यान आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. मात्र पोलिस आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही वेळात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर संजय राठोडवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी राघवेंद्र मानकर म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.