‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ फेम पूनम पांडेचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Poonam Pandey Passed Away | लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पूनम पांडेनं वयाच्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

पूनम पांडेच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या निधनाबाबत पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं की, आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. पूनमला सरव्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे. पूनम पांडेच्या निधनाच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

पूनम पाांडेच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे, आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात असलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती. पूनमच्या पोस्टवर हे अकाउंट हॅक झालं आहे, ही पोस्ट खोटी ठरू देत, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी करीत आहेत.

कोण आहे पूनम पांडे?

पूनम पांडेने 2013 मध्ये ‘नशा’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं.
त्यानंतर ‘द जर्नी ऑफ कर्मा’ आमि ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’ अशा चित्रपटांमध्ये काम करुन तिने
आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’,
‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ या शो मध्ये देखील ती झळकली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पोलीस अधिकाऱ्याला झाडाची कुंडी फेकून मारत आत्महत्या करण्याची धमकी, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुण्यातील नऱ्हे परिसरातील फ्लॅटमध्ये वडील, मुलगा मृतावस्थेत आढळले, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला

गोळीबार करुन सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे ग्रामीण पोलिसांकडून तीन पिस्टल व दोन काडतुसे जप्त