फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 3 स्कीममध्ये गुंतवणूक करा, पैसे होतील ‘दुप्पट’, बँकेपेक्षा मिळणार अधिक ‘लाभ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या तुलनेत जास्त नफा मिळतो. पोस्ट ऑफिस खातेदारांना वेगवेगळ्या योजनांची ऑफर केली जाते ज्यात गुंतवणूक करून ते अत्यंत चांगली रक्कम मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे देखील अधिक सुरक्षित मानले जाते, कारण त्याचे पूर्ण नियंत्रण सरकारकडे असते. अशात कोणत्याही गुंतवणूकदाराचे भांडवल सुरक्षित राहते.
बहुतेकदा खातेदारांना हा संभ्रम असतो कि कोणती योजना निवडावी आणि कोणती नाही. खातेदारांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या त्या तीन योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट-चौपट करू शकता. यात तुम्हाला चांगले व्याज मिळते.
१. किसान विकास पत्र :- ही एक छोटी बचत योजना आहे ज्यात गुंतवणूक करून ग्राहकांना त्यांची गुंतवणूक रक्कम सुरक्षित असल्याची हमी मिळते. केंद्र सरकारने अलीकडेच या योजनेचे व्याज दर ६.९ टक्क्यांपर्यंत कमी केले, परंतु तरीही या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. जर आपण या योजनेंतर्गत गुंतवणूक केली तर आपल्याला दहा वर्ष चार महिन्यांनंतर म्हणजे १२४ महिन्यांनंतर दुप्पट रक्कम मिळेल. उदाहरणार्थ जर आपण आज ४ एप्रिल २०२० रोजी पन्नास हजार रुपये जमा केले तर ४ ऑगस्ट २०३१ रोजी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये मिळतील.
२. टाइम डिपॉजिट स्कीम :- या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना खूप फायदा होतो. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणुकीवर ६.७ टक्के दराने व्याज मिळते. तर मॅच्युरिटीवर या योजनेला कितीही वर्षांसाठी पुढे वाढवू शकता. जर खातेदाराने या योजनेत २० वर्षांसाठी १ लाख रु. गुंतवले तर त्याला एकूण ३,६५,८३८ रु. मिळतात, ज्यात व्याज म्हणून २,२,९७२ रु. आहेत.
३. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट :- तुम्ही छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी NSC हा चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला १ लाख रु. गुंतवणुकीवर २४० महिन्यानंतर ३,७२,७५७ रु. मिळतात, ज्यात ६.८ दराने सध्याच्या दराअंतर्गत तुम्हाला २,३,७३४ रु. व्याज मिळते. या योजनेत तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता, पण जर तुम्ही याला पुढे वाढवले तर तुमच्या गरजेनुसार याला पुढे वाढवू शकता.