Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसची ग्रामीणवासीयांसाठी जबरदस्त स्कीम ! केवळ 95 रुपये गुंतवा अन् मिळवा 14 लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | भारतातील सर्वाधिक मोठी आणि सुरक्षित योजना म्हणून भारतीय पोस्ट ऑफिस कडे पाहिले जाते. पोस्ट ऑफिस वर सर्वच नागरिकांचा विश्वास आहे. आपल्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक लाभदायक योजना (Post Office Saving Scheme) आणते. त्या योजने अंतर्गत चांगला परतावा देखील मिळतो. आता पोस्ट ऑफिसने ग्रामीण भागातील नागरीकांसाठी एक योजना आणली आहे, यामध्ये दररोज फक्त 95 रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवेळी 14 लाख रुपये मिळू शकतात. असं सांगण्यात येत आहे. या योजनेबाबत जाणून घ्या.

 

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज योजना तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतात. ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना (Gram Sumangal Grameen Dak Jeevan Vima Yojana) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. ग्रामीण भागातील नागरीकांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये विमाधारकाला जीवंत असताना मनी बॅकचा पर्याय उपलब्ध केला आहे. याव्यतिरिक्त या पॉलिसी अंतर्गत बोनस देखील दिला जातोय. (Post Office Saving Scheme)

ग्राम सुमंगल योजना मनी बॅक पॉलिसीचा (Gram Sumangal Yojana) लाभ आणि बोनस देते.
हा विमा 15-20 वर्षांसाठी घेतला जाऊ शकतो, परंंतु, यासाठी पॉलिसीधारकाचे वय 19 ते 45 वर्ष असावे लागते.
एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी 7 लाखांच्या गुंतवणुकीसह वीस वर्षांसाठी ही पॉलिसी खरेदी केली, तर त्याला रोज 95 रुपये हप्ता बसू शकतो.
प्रतिमहिना 2850 रुपये द्यावे लागतील. 3 महिन्यांसाठी हप्ते भरल्यास, तुम्हाला 8850 रुपये आणि 6 महिन्यांसाठी तुम्हाला 17,100 रुपये भरावे लागतील.
यानंतर, तुम्हाला मॅच्युरिटीवर अर्थात 20 वर्षे पूर्ण झाल्यावर जवळपास 14 लाख रुपये मिळू शकते.

 

या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांची विमा रक्कम दिली जातेय.
पॉलिसी दरम्यान व्यक्तीला जिवंतपणी 15 वर्षांत 6 वर्ष, 9 वर्ष आणि 12 वर्षांमध्ये वीस टक्के पर्यंत पैसे परत दिले जातात.
मॅच्युरिटीवर बोनससह बाकी रकमेपैकी 40 टक्के रक्कमही संबधित ग्राहकाला परत दिली जातेय.

 

Web Title :- Post Office Saving Scheme | post office gram sumangal yojana invest just only 95 rs daily and you can get 14 lakh on maturity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा