Pune NCP Prashant Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका; म्हणाले – ‘भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Senior BJP Leader Kirit Somaiya) यांना मागील आठवड्यात पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) धक्काबुक्की झाली होती. यावरून मोठे वादंग पेटले होते. या घटनेनंतर किरीट सोमय्या हे आज (शुक्रवार) पुन्हा पालिकेत आले होते. यावेळी सत्ताधारी भाजपच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत सोमय्या यांचा सत्कार केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune NCP Prashant Jagtap) यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. शिवजयंती उत्सवाच्या (Shiv Jayanti Celebration) परवानगीसाठी (Permission) आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही गेटवरच रोखून धरण्यात आले. शिवजयंतीच्या उत्सवापेक्षाही पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना किरीट सोमय्यांचे लाड पुरवणे महत्वाचे वाटले. भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली अशी टीका प्रशांत जगताप (Pune NCP Prashant Jagtap) यांनी केली.

 

प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत येणार असल्यामुळे पुणे महानगरपालिका व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. महानगरपालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ जवळपास 300-350 पोलिसांचा जागता पहारा होता. काल दुपारपासूनच शिवाजीनगर पोलिस स्टेशन (Shivaji Nagar Police Station), एसीपी (ACP), डीसीपी (DCP) यांनी तातडीने बैठकांचं आयोजन करून माझ्यासह पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आंदोलन करू नये याबाबत विनंती केली. या सर्व गोष्टी सुदृढ लोकशाहीसाठी मारक आहेत. तक्रार करण्यासाठी माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून त्यांना झूम मिटिंग, ईमेल, व्हाट्सऍप असे अनेक मार्ग उपलब्ध असताना केवळ चमकोगिरी, स्टंटबाजी करण्यासाठी त्यांनी संपूर्ण पुणे शहराला वेठीस धरणं अतिशय चुकीचं उदाहरण प्रस्थापित केलं असल्याचे जगताप म्हणाले. (Pune NCP Prashant Jagtap)

भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली
जगताप पुढे म्हणाले, पुणे शहराच्या बाहेरील भारतीय जनता पार्टिचा एक माजी खासदार केवळ एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी, राजकीय फायद्यासाठी पुणे शहरातील पोलीस (Pune City Police) दलास नाहक कामास लावतो हे दुर्दैवी आहे. विचारवंतांचे शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (Maharashtra Cultural Capital) अशी ओळख असलेल्या पुणे शहरात यानिमित्ताने भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली. 5-6 दिवसांपूर्वी किरीट सोमय्या महानगरपालिकेत आले, स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वतःच पायरीवरून घसरले, आपल्यावर हल्ला झाल्याचा त्यांनी खोटा बनाव केला. त्यानंतर आज पुन्हा महानगरपालिकेत येण्यासाठी हट्ट धरला. त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी आज पुणेकरांचे झालेले हाल आपण पाहिले.

 

सत्ताधाऱ्यांना किरीट सोमय्यांचे लाड पुरवणे महत्वाचे वाटले
शिवजयंती उत्सवाच्या परवानगीसाठी आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही गेटवरच रोखून धरण्यात आले.
शिवजयंतीच्या उत्सवापेक्षाही पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना किरीट सोमय्यांचे लाड पुरवणे महत्वाचे वाटले.
त्यासोबतच अत्यावश्यक सेवेसाठी महानगरपालिकेत येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
अनेक रुग्णांचे नातेवाईक कागदपत्रांसाठी डोळ्यात पाणी आणून याचना करत असतानाही सत्ताधारी भाजपला पाझर फुटला नाही.
यावरूनच भाजपचा कारभार किती लाजिरवाणा आहे हे आपल्या लक्षात येते.

धर्माच्या नावाने मत मागणारा पक्ष
पुणेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी आवाहन करतो कि मोदींच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही ज्यांना महानगरपालिकेची सत्ता दिली,
त्यानंतर दोनच महिन्यात भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून महानगरपालिकेत झालेली सभागृह नेते कार्यालयाची तोडफोड ते आज किरीट सोमय्यांच्या निमित्ताने
महानगरपालिकेला आलेलं छावणीचं स्वरूप या सगळ्या गोष्टी दुर्दैवी आहेत.
धर्माच्या नावाने मत मागणारा पक्ष आपल्या स्वार्थासाठी शहर वेठीस धरताना कोणाताही धर्म विचारात घेत नाही.
यापुढे मतदान करताना पुणेकरांनी या गोष्टींचा विचार करावा असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

 

Web Title :- Pune NCP Prashant Jagtap | Pune NCP city president Prashant Jagtap; Says – ‘Citizens got to see BJP’s ideological bankruptcy’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

 

BJP MLA Suspension Revoked | अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 335 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी