Post Office scheme | ‘ग्राहकांसाठी गुंतवणुकीची खास योजना ! ‘5 लाखांची गुंतवणूक करा आणि मिळवा 10 लाख रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Post Office scheme । अनेक लोक आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतात. मात्र पोस्ट ऑफिसने (Post Office scheme) एक मोठी आणि महत्वपूर्ण योजना आणली आहे. यासाठी अनेक ग्राहक पोस्टात आपल्या पैशाची गुंतवणूक अगदी व्यवस्थितरित्या भरू शकणार आहे. किसान विकास पत्र (KVP Kisan Vikas Patra) ही पोस्ट ऑफिसची (Post Office) योजना आहे. या पोस्टाने आखून दिलेल्या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला चांगला परतवा मिळणार आहे. तसेच, या योजनेत सरकारी जिम्मेदार देखील असणार आहे. यामुळे या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे अगदी सुरक्षित राहणार आहेत. यात व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाहीद्वारे ठरवलं जातोय. तर, यात पोस्टाची किसान विकास पत्राची योजनेत मॅच्यूरिटी अवधी 124 महिने आहे. अर्थात या योजनेत ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी अर्थात 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील.

किसान विकास पत्र योजना –

पोस्ट ऑफिसची ही किसान विकास पत्र योजना (KVP Kisan Vikas Patra) हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते, जे तुम्ही कुठल्याही पोस्टातून खरेदी करू शकणार आहे. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जाहीर केलं जाते. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. ग्राहक याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकते दोघांच्या नावावरही याची खरेदी करता येणार आहे.

Post Office scheme | post office small saving scheme invest 5 lakhs rupees and get rs 12 lakh in kisan vikas patra

व्याजदर किती?

2021 वर्षीच्या पहिल्या तिमाहीसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या दरात 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत, समजा ग्राहकांनी एकरकमी पाच लाख भरले तर ग्राहकाला मॅच्यूरिटीनंतर दहा लाख रुपये मिळणार आहेत. या स्कीमचा परिपक्वता कालावधी (Maturity period) 124 महिन्यांचा आहे.

कोण करू शकणार गुंतवणूक?

या योजनेत (KVP Kisan Vikas Patra) गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय किमान18
वर्षे गरजेचे. हे एक प्रमाणपत्र आहे जे ग्राहक कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकते.
सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. ज्याची देखरेख पालकाकडून
केली जाते त्यासाठी अल्पवयीन मुलासाठी देखील खरेदी करू शकणार आहे. KVP मध्ये 1 हजार
रुपये, 5 हजार रुपये, 10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल. KVP एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केले जाते. किसान विकास पत्र (KVP Kisan Vikas Patra) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाते. दरम्यान, किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करतात.

काय लागेल दस्तऐवज?

– या योजनेत दोन पासपोर्ट साइझ फोटो,
– ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.)
– निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल.
– जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा अधिक असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक
– यात गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे पण मनी लाँड्रिंगचा धोका टाळण्यासाठी 2014 पासून 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन अनिवार्य आहे.
– जर तुम्ही 10 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करत असाल तर इनकम प्रुफ ( ITR, सॅलरी स्लीप आणि बँक स्टेटमेंट) द्यावा लागेल.

हे देखील वाचा

Gang Rape | कंडोमने सोडवली केस, फिल्मी स्टाइलमध्ये गजाआड केले गँगरेप आणि खूनातील आरोपी

MPSC | राज्य सेवा आयोगाची परिक्षेची नवी तारीख जाहीर; 4 सप्टेंबर रोजी होणार अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Post Office scheme | post office small saving scheme invest 5 lakhs rupees and get rs 12 lakh in kisan vikas patra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update