Homeताज्या बातम्याPost Office Scheme | पोस्ट ऑफिसची 'ही' योजना पती-पत्नीला दर महिना देईल...

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुक करणे सुरक्षित मानले जाते. येथील बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांनाचांगला नफा मिळू शकतो. पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेंतर्गत (Post Office monthly income scheme) पती आणि पत्नी जॉईंट अकाऊंटद्वारे दर महिना गॅरंटेड इन्कम मिळवू शकतात. (Post Office Scheme)

 

परंतु यासाठी या योजनेत एक रकमी रक्कम जमा करावी लागते. यामध्ये जॉईंट अकाऊंट उघडण्याची सुविधा मिळते. ज्यामध्ये सिंगल आणि जॉईंट (3 व्यक्तींपर्यंत) दोन्ही अकाऊंट उघडता येऊ शकतात. ज्याची मॅच्युरिटी पाच वर्षासाठी असते.

 

ही योजना पाच वर्षाच्या लॉकइन कालावधीसह येते. किमान 1000 पासून 4.50 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. तुमचे संयुक्त खाते असेल तर यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. योजनेत 6.60 टक्केने वार्षिक व्याज मिळते.

 

असे कमाऊ शकता दर महिना 5000 रू.
सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. मात्र, जॉईंट खाते उघडणे आणि 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे रिटर्न दुप्पट होऊन 59,400 रुपये होईल. जर आपण हे 12 महिन्यात विभागले तर प्रत्येक महिन्याला रिटर्नम्हणून 4,950 रुपये मिळू शकतात. जर आपण रिटर्न विड्रॉ केले नाही आणि वार्षिक 59,400 रुपये व्याजाची रक्कम खात्यात ठेवून दिली, तर यावर सुद्धा जास्त व्याज मिळू शकते. (Post Office Scheme)

वेळेपूर्वी खाते बंद झाल्यास
जर खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या अगोदर खाते बंद केले
तर मूळ रक्कमेतून 2 टक्केच्या बरोबरीची कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाइृल.
जर खाते उघडण्याच्या तारखेच्या 3 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केले तर मुळ रक्कमेतून 1 टक्के कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.

 

कोण आहेत या योजनेसाठी पात्र
भारतीय रहिवाशी मासिक उत्पन्न योजनेत जवळच्या पोस्टात आवश्यक कागदपत्रे जमा करून खाते उघडू शकतो.
10 वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन आपल्या नावाने हे खाते उघडू शकतात,
परंतु कागदपत्रे म्हणून त्यास आपल्या पालकांची कागदपत्रे सुद्धा द्यावी लागतील.

 

Web Title :- Post Office Scheme | this scheme of post office will give around 5000 rupees to husband and wife every month know how it possible

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News