भाजपच्या राजीव गांधीवरील पोस्टरला काँग्रेसकडून उभारलेल्या पोस्टरने प्रतिउत्तर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक (फादर आॅफ द मॉब लिचिंग) असल्याचे फलक दिल्लीत भाजपाकडून लावण्यात आले होते. भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणी असे फलक लावले होते. भाजपाच्या या कृतीवर राजकीय वतुर्ळातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई काँग्रेसने याला उत्तर दिले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देणारे पोस्टर लावले असून प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. हा संस्कारांचा फरक आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

[amazon_link asins=’B07B6SN496,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20c9dc7a-ab55-11e8-95ae-4d03cd8547e7′]

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशभरात विशेषत: दिल्लीमध्ये समुहाकडून मोठ्या प्रमाणावर शिखांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अचानक पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांनी या हत्याकांडाबद्दल महावृक्ष कोसळल्यावर असे प्रकार होतात, असे म्हटले होते. या हत्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचे अजूनही आरोप होत असतात. त्यावरुन राजीव गांधी यांना जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक असे संबोधनाचे पोस्टर भाजपने दिल्लीत लावले.

बग्गांनी सुरू केलेल्या या पोस्टर वॉरला काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधींबाबतचे दोन्ही पोस्टर शेअर केले असून त्यावर प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. आणखी काही काळ वाट पाहा. जनता तुमच्या अहंकार आणि द्वेषाला लवकरच योग्य उत्तर देईल, हा संस्कारांचा फरक आहे, असे झा यांनी म्हटले.

तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुवेर्दी यांनी ट्विट केले आहे. २००२ च्या दंगलीवेळी काही खास करू न शकलेल्या त्या दिवंगत पंतप्रधानांना श्रद्धांजली देण्याचे काँग्रेसवर संस्कार आहेत. तर भाजपाच्या कार्यालयाबाहेर देशासाठी प्राण देणाऱ्या दिवंगत पंतप्रधानाबाबत तिरस्कारात्मक पोस्टर लावण्यात आले आहेत. यातून भाजपाची तुच्छ मानसिकता दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.