विक्रमी मतांनी वरपूडकरांचा विजय निश्‍चित आ. बाबाजानी दुर्रानी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी मतदारसंघातून शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला उपस्थितांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरील जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री सुरेश वरपुडकर म्हणाले की विधानसभा निवडणुकीत आघाडीच्य पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. जाहीर सभेत पुढे बोलताना ते म्हणाले , आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता त्याचा वचपा या निवडणुकी काढा असे त्यांनी सांगितले.

durranni news

युतीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु कर्ज माफी कोणाला मिळाली केवळ घोषणा करणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. संपूर्ण महाराष्ट्र सत्ता बदलाचे वारे वाहत आहे आघाडीचे सरकार आले तर अजित दादा पवार यांनी कर्जमाफी करणार असल्याचा दिलेला शब्द ते पूर्ण करतील असाविश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या ताकदीवर आपला विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

आमदार बाबाजानी दुर्रानी हे ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडलेले नेते आहेत याचा फायदा निवडणुकीत नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांना बोलताना आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर सभेला एवढी मोठी गर्दी पाहून मला वाटते की, कोणा भविष्यकाराची गरज वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले वरपूडकर तुमचं विक्रमी मतांनी विजय निश्‍चित असल्याचे त्यांनी सांगितले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरुद्ध लढल्याने अपवादाने मोहन फड विजयी झाले.

durrani 11

परंतु आता मात्र दोन्ही पक्ष आघाडीत आहेत त्यामुळे सुरेश वरपुडकर यांचा विक्रमी मतांनी विजयी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आघाडीच्य स्पर्धी पक्षाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होईल एवढ्या मताधिक्याने वरपुडकर यांना निवडून देण्याचे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी विचार मंचावरील प्रेरणा वरपुडकर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भावना नखाते विश्वनाथ थोरे, चक्रधर उगले , मारुती पैलवान राजेश विटेकर प्राध्यापक किरण लिंबाजी कचरे पाटील सोनटक्के आदींनी आपले विचार मांडले.

विचार मंचावर माजी मंत्री सुरेश वरपुडकर आमदार बाबाजानी दुर्रानी परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर जिप सदस्य कुंडलिकराव सोगे सर्जेराव गिराम दादासाहेब टेंगसे, पंडीत चोखट, अकबर अंसारी आली अफसर अन्सारी पाथरी सोनपेठ मानवत परभणी ग्रामीण भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्केट कमिटी मैदानावरील सभा विसर्जित होऊन त्याचे रॅलीत रूपांतर झाले मार्केट कमिटी येथून ते तहसील पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी सभेचे महारॅलीत रूपांतर झाल्याचे पाहायला मिळाले.